ठाकरे गटातील दुफळी चव्हाट्यावर… वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग देखील आला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Lok Sabha)ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group)भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते. मात्र वाकचौरेंच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार असे चित्र निर्माण झाले आहे. वाकचौरे यांना आता स्वपक्षातूनच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांनी जनतेसह शिवसेनेची फसवणूक केली, अशा व्यक्तीला जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांच्याविरोधात बंड करु असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड (Ashok Gaikwad )यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यामुळे लोकसभेपूर्वीच शिर्डीमध्ये ठाकरे गटापुढे पेच निर्माण झाला आहे.
मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, 5-7 जण आत अडकले; महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
लोकसभा निवडणूक जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पक्षांमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नगर दक्षिणमध्ये लोकसभा उमेदवारीवरुन भाजपामधीलच दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोन नेत्यांमधील वाद हा पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. तशीच परिस्थिती आता ठाकरे गटात शिर्डी मतदार संघासाठी निर्माण झाली आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्याचा डाव आहे, मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटातील पदाधिकारी असलेल्या गायकवाड यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट
वाकचौरेंना उमेदवारी दिली तर बंड…
लोकसभेच्या अनुषंगाने ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वाकचौरे यांना हाताशी धरत शिर्डी लोकसभा मतदार संघ पिंजून काढला. वाकचौरे हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील, हे देखील जवळपास फायनल होत असतानाच एक अडचण समोर आली आहे. ठाकरे गटाचे नगर जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात बंड पुकारले आहे. शिर्डीचे साईबाबा, उध्दव ठाकरे आणि जनतेला फसविणारे पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दावेदार, हे दुर्दैव आहे. आपण शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून योग्य असल्याचे वरिष्ठांना पटवून दिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंड करणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले.
उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभेच्या रिंगणात
शिर्डी मतदार संघ हा ठाकरे गटाचे बालेकिल्ला समजला जातो. यामुळे ठाकरे गटाकडून याठिकाणची जागा लढवली जाणार. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले. आता हीच संधी साधत वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. लोकसभेपूर्वी त्यांची एंट्री म्हणजे लोकसभेचे तिकीट त्यांना मिळणार हे गणित आखले गेले. मात्र अशा दलबदलू नेत्यांना उमेदवारी देण्यापेक्षा युवा व पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना ही जागा लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनी पक्षश्रेष्टींकडे केली आहे. शिर्डीची जागा काँग्रेससाठी सोडल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे देखील रुपवते यांनी स्पष्ट केले आहे.