Prakash Solanke Retirement : बीड जिल्ह्यातील माजलगावचे नेते प्रकाश सोळंके यांनी आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आपला राजकीय वारसदारही त्यांनी यावेळी जाहीर केला आहे. मात्र, या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. (Prakash Solanke ) राजकारणात मोठ्याने कुठं थांबायचं हे ठरवायला पाहिजे, शरद पवारांनीही वेळीच थांबायला पाहिजं होतं असंही आमदार सोळंके यावेळी म्हणाले आहेत.
तुम्ही अमेरिकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय का? फडणवीसांची शरद पवार, राहुल गाधींवर टीका
पवार थांबले असते तर
मी पाच वर्षांपूर्वीच यापुढे जयसिंह सोळंके हेच माझे पुढचे राजकीय वारसा चालवतील असं जाहीर केलं होतं. राजकारणामध्ये मोठ्याने कुठं थांबायचं हे ठरवायला पाहिजे. शरद पवारही वेळीच थांबले असते तर त्यांच्या घरामध्ये जे घडलं ते घडलं नसतं असं मला वाटतं, असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाच सल्ला दिल्याचं दिसून येत आहे. तसंच, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधी बघितलं नव्हतं. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
मुलांना काही रस नाही
येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही. मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी मी राजकाणामधून निवृत्ती घेतलेली नाही. मी सगळ्या यंत्रणेमध्ये असणार आहे. मला दोन मुलं आहेत. मात्र, त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. मुलीला देखील नाही, म्हणूनच राजकीय वारस म्हणून चॉईस हा माझा पुतण्या जयसिंह हाच होता, असं स्पष्टीकरण आमदार सोळंके यांनी दिलं.
अजितदादांच्या आमदाराचा राजकीय संन्यास; वारसदारही ठरला!
कोण आहेत जयसिंह सोळंके?
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.