Prakash Solanke : जाळपोळीमागे माझे राजकीय विरोधक; प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप

Prakash Solanke : जाळपोळीमागे माझे राजकीय विरोधक; प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप

Prakash Solanke : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अजित पवारग गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घराची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.  दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांचा जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेमागे कोणते लोक होते, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती दिली. जमावात काळाबाजार करणारे लोक होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारेही काही होते. जे 300 जण आले होते ते तयारीनेच आले होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आले होते, असा गंभीर आरोप सोळंके यांनी केला.

Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…

30 ऑक्टोबरला मी घरीच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते. त्यावेळी पाच हजार तरुण आले होते. साडेदहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणार आहे अशी माहिती दिली. तरीदेखील मी तिथेच थांबलो. त्यांच्याशी चर्चा करता यावी असे वाटत होते. माझ्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावात काळाबाजार करणारे लोक होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारेही काही होते. जे 300 जण आले होते ते तयारीनेच आले होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आले होते, असे सोळंके म्हणाले.

सरसकट नको, फक्त दोषींवर कारवाई करा 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांना दिले आहेत. आता माझे इतकेच म्हणणे आहे की यातील जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. सरसकट कारवाई करू नका. या जमावात अवैध धंदे करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधकांचे कार्यकर्तेही त्यात होते. विशेष म्हणजे या 250 ते 300 समाजकंटकांच्या तावडीतून आपल्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाचविले त्यामुळे जीव वाचला, असेही सोळंकी यांनी सांगितले.

अजितदादा व्याधीग्रस्त तर, फडणवीस…; CM शिंदेंची बाजू घेत खडसेंनी डिवचलं

जमावाने माझी तीन वाहने जाळली 

जमावाने माझी तीन वाहने जाळली. मला भेटायला आलेले कार्यकर्ते होते त्यांचीही गाडी जळाली. सात ते आठ मोटारसाकलीही होत्या. यात पोलिसांच्याही दुचाकी होत्या. ते ज्या तयारीने आले होते ते पाहता त्यांचा हेतू दगडफेक, जाळपोळ बरोबरच माझ्या जीविताला हानी करण्याच्या दृष्टीने प्लॅनिंग करून ते आले होते, असा दावा सोळंके यांनी केला.

आरक्षण कधी देणार, सरकारने खुलासा करावा 

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत मी अनेक वेळ चर्चा केली आहे. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने आता मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम द्यावा. आरक्षण कसं देणार याबाबत खुलासा करावा. हल्ला करणारे नेमके कोण होते, कोणत्या पक्षाचे होते याची माहिती नाही. आतापर्यंत 21 लोकांना अटक झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार आहेच.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube