अजितदादा व्याधीग्रस्त तर, फडणवीस…; CM शिंदेंची बाजू घेत खडसेंनी डिवचलं

  • Written By: Published:
अजितदादा व्याधीग्रस्त तर, फडणवीस…; CM शिंदेंची बाजू घेत खडसेंनी डिवचलं

जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचे (Manoj Jarange) मन वळवण्यात सरकारला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. आतापर्यंत सरकाकडून देण्यात आलेले सर्व पर्याय जरागेंनी फेटाळून लावले असून, आज (दि.2) जरांगेंच्या भेटीसाठी शिंदेंचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीत दाखल होणार आहे. तर, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले असून, या सर्व घडामोडींमध्ये कधीकाळी भाजपात राहिलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) फडणवीस आणि अजितदादांना टार्गेट केले आहे. (Eknath Khadse Attack On Devendra Fadnavis & Ajit Pawar)

Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…

फडणवीस प्रचारात तर, अजितदादा व्याधीग्रस्त

फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल करताना खडसेंनी घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. सुरुवातीच्या काळात सुप्रीम कोर्टात जे विधेयक मांडलं ते जाणीवपूर्वक मराठा आरक्षण संदर्भात विधेयक कमजोर व्हावं अशा प्रयत्नाचे होते असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकटे पडल्या म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटे मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतात हा प्रश्न आहे. आता तुम्ही सत्तेत आहेत त्यामुळे जे आहे ते आरक्षण मिळवू दाखवा, उगाच इतरांना कशासाठी दोष देण्यात काही अर्थ नाही. केंद्राने यात हस्तक्षेप करून घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावं अशी मागणीही यावेळी खडसेंनी केली.

खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक

मराठा आरक्षणाला न्याय देण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती. जर मी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर, राजकीय संन्यास घेईन असे फडणवीस म्हणाले होते. अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेण्याची वेळ आता आली असल्याचेही यावेळी खडसे म्हणाले.

गिरीश महाजन फेल

यापूर्वी जरांगे अपोषणाला बसले होते. त्यावेळी त्यांचे मन वळवण्याचे काम भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता आज पुन्हा नव्याने सहभागी असलेलं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेटीला जात असेल मात्र ज्या ज्या वेळी संकटमोचक गिरीश महाजन हे भेटीला गेले आहेत ते फेल ठरल्याची टीका देखील यावेळी खडसेंनी महाजन यांच्यावर केली. शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेले तरी तो प्रश्न सुटणार नसल्याचे खडसे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube