खडसे संकटाच्या फेऱ्यात! कुटुंबियांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

खडसे संकटाच्या फेऱ्यात! कुटुंबियांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Eknath Khadse : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आताही खडसे एका मोठ्या संकटात सापडले आहेत. खडसे यांच्या कुटुंबियांना तब्बल 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनाच ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशी करून तसा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. सातोड येथील एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह सहा जमीनमालकांना तहसीलदारांना या नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य 26 कोटी 1 लाख 12 हजार 117 रुपये इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 137 कोटी 14 लाख 81 हजार 883 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

NCP Crisis : ‘जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात’; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा

आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. कोट्यावधींचे बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याचे पुरावे सुद्धा आहेत. माझा आरोप खरा असल्याने एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. आता चौकशी पूर्ण झाली असून कारवाईलाही सुरुवात होईल असे आमदार पाटील यावेळी म्हणाले. आमदार पाटील यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित केला होता. गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला होता. या प्रकरणात चौकशी झाल्याने खडसे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार आहेत. आता या प्रकरणीत एकनाथ खडसे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तेलगी घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग? ‘Scam 2003 Part 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube