Download App

रिक्षावाला आला रिक्षाचालकांच्या मदतीला ! 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार देणार, मंत्री सरनाईकांची घोषणा

  • Written By: Last Updated:

Pratap Sarnaik Announcement For Taxi Rickshaw Drivers : आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय. 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना (Rickshaw Driver) 10 हजार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केलंय. या मंडळाच्या माध्यमातून आदर्श रिक्षा चालकांना पुरस्कार देणार आहोत. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेल्या 65 वर्षांवरील काही रिक्षा चालकांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत.

प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा अन् कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. ते या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.

शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका, आदित्य ठाकरेंनी दिली तंबी

सरनाईक पुढे म्हणाले की, 27 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.

राज्यभरातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना 500 रुपये नोंदणी शुल्क आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले. या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासत्व नोंदणी करता येईल. 65 वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेतंर्गत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.

सारखीच बडबड…राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल

या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे. कर्तव्यावर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.
उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलंय. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांच्या सहमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

 

follow us