Download App

फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा

भाजपने दोस्ती केली तर करु, पण फणा काढाल तर ठेचल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी दिला आहे. पुण्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा पार पडली. या यात्रेनंतर 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत जानकर बोलत होते. यावेळी बोलताना जानकरांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे.

India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?

महादेव जानकर म्हणाले, भाजपने महादेव जानकरांचा एकही आमदार होऊ द्यायचा नाही, असं ठरवलं होतं, पण मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार निवडून आणला आहे. आम्ही सोबत नसतो तर तुमचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नसता, भाजपने आम्हाला फसवलं असल्याचा आरोपही जानकर यांनी यावेळी केला आहे.

Sanjay Shirsat राऊतांवर भडकले म्हणाले, आपण पाकिस्तानात..

आज आम्हाला तुम्ही हसताय, भिकारी समजत आहात, मात्र आम्ही डिमांडर नसून कमांडर आहोत, काँग्रेस-राष्ट्रवादी हरवण्यासाठी आम्ही 150 सभा घेतल्या. मात्र, सत्ता आल्यावर आम्हाला विसरले. आम्ही दोस्ती करतो तर दोस्ती सारख तुम्ही वागा, निवडणुकीत तुम्हाला सर्वच समाजाला संधी द्यावी लागणार आहे, आम्ही कोणालाही भीत नसून सध्या आमची कोणाशीच युती नसून पुढील काळात महाराष्ट्रात चित्र स्पष्ट होणार असल्याचंही जानकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘CBI’ कडून ‘ईडी’च्या अधिकाऱ्याला बेड्या; काय आहे प्रकरण?

राज्यात इतका मोठा समाज असूनही आम्हाला भीक मागवी लागत आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणात भानगड केलेले तिकडे जात आहेत. आम्ही कोणीही भानगड केलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत चारही पक्षांपासून सावध राहून रासपचे हात बळकट करा, दोन पक्षात ताकद वाढल्यास आपला राष्ट्रीय पक्ष होणार असल्याचा विश्वासही महादेव जानकरांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजप जर मोठा पक्ष आहे तर मग छोटे पक्ष कशासाठी सोबत घेत आहे, कारण तुमच्यात कॉन्फिडन्स नाही. काल काँग्रेसने जे केले ते आज भाजप करत असून बाहेरून आलेले मंत्रिपद भोगत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us