Download App

कार्यक्रमात अजित पवार शरद पवारांच्या मागून का गेले? दादांनी सांगून टाकलं

शरद पवारसाहेबांचा मी आदर करतो म्हणूनच कार्यक्रमात मी मागून गेलो असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार शरद पवारांच्या मागून गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

Ahmednagar Crime : स्टेट्स ठेवत पतीने घेतला गळफास… मृत्यूचे कारण ऐकून व्हाल हैराण

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परिवार तो परिवार असतो, मागे काकींची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी घरी जाऊन भेट घेतली. राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात पण परिवारिक संबंध असतात, शरद पवार साहेबांचा आदर करतो म्हणून मागून गेलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

IPS अधिकाऱ्याची अवघ्या 3 तासांत बदली; तुकाराम मुंढेंचाही मोडला रेकॉर्ड

यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मणिपूर हिंसाचार, संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, समृध्दी महामार्ग अपघाताची घटनेवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समृद्धी महामार्गावरील शहापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली असून कंपनीचे कामे डे नाईट सुरु असल्याने कंपनीने खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली असून यासंदर्भातील अंतिम माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे.

संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

तसेच शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांची चौकशी होणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मणिपूरची घटना माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही, अनेकांनी संसदेत आपली भूमिका मांडली, निषेधही केला, भारतात आपण महिलांना सन्मानाने वागणूक देतो, या घटनेतील दोषी असणाऱ्याला कडक शासन झालं पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

दरम्यान, पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक केलं आहे. मोदींसारखा लोकप्रिय नेता दुसरा कोणी नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. मी सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्र सर्वांगीण विकासासाठी सत्तेत सामिल झालो असून राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावता येतील, म्हणूनच सत्तेत गेलो असल्याचं पुन्हा एकदा अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us