Download App

Prithviraj Chavan : सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं ही चूकच; चव्हाणांनी अखेर मान्य केलंच

Prithviraj Chavan : मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपाची महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. काँम्पिटीटर फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. खासदार राजीव सातव पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांना हा पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला.

तर भाजप सत्तेत आला नसता, मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटला असता 

यावेळी राजकारण आणि प्रशासनावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामधील राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय निर्णयाविषयी कबुली दिली. सहकार क्षेत्राबद्दल मला फारसं माहिती नव्हतं. मी अनेक गोष्टी समजून घेतल्या. सहकार क्षेत्रामध्ये शिस्त आणायचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले. त्यांनतर आमच्यात वाद झाले. त्याचे परिणाम सरकार पडण्यात झाला. हे मंडळ बरखास्त केलं नसतं तर 2014 आणि 2019 ला देखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली असती. भाजप सत्तेत आली नसती अशी स्पष्ट कबुली चव्हाण यांनी दिली. भाजप सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणाबाबत त्यानी चिंता व्यक्त केली. किमान सरकारी नोकरीचे खासगीकरण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा

यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेच्या शिस्ताची देशभरात लौकिक होता. पण आता तशी शिस्त आज दिसत नाही. राज्याचा सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही. यात आता मोठ्या बदलांची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य केल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपण तरुणांना रोजगार कसा देऊ शकतो हा प्रश्न आहे. भविष्यात ग्रामीण भागात आर्थिक विषमतेवरून तरुणांमध्ये असंतोष निर्माण होईल. ग्रामीण भागातच रोजगार, शाश्वत शेती आणि योग्य उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेतमालाला बाजारभाव मिळत नसताना दुसरीकडे जगातील शेतकऱ्यांना भारतीय बाजारपेठेत प्राधान्य मिळत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Marathwada Water : ..हा तर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाणांचा संताप

Tags

follow us