NCP News : ‘राष्ट्रवादी’ पक्ष कुणाचा? शरद पवार की अजितदादांचा? आज सुनावणी

NCP News : ‘राष्ट्रवादी’ पक्ष कुणाचा? शरद पवार की अजितदादांचा? आज सुनावणी

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. शरद पवार गटाने जवळपास 8 ते 9 हजार कागदपत्रे जमा केल्याची माहिती आहे. या दोन्ही गटाच्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत तर काही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत. तसेच निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. यावरच आज आयोग (Election Commission) निकाल देण्याची शक्यता आहे.

NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. सुनावणी होऊन आयोग या प्रकरणात निर्णय देईल अशी शक्यता आहे. तसेच ही सुनावणी कदाचित पुढे लांबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या वादात आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे. यावर अद्याप निर्णय आलेला नाही. सुप्रीम कोर्टानेही विधानसभा अध्यक्षांच्या कामकााजवर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यात विधानसभा अध्यक्षांकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात पवार गटाच्या याचिकेवरही निकाल द्यावा असे कोर्टाने म्हटले आहे.

NCP Crisis : ‘जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात’ राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा

शरद पवार गटाकडून यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. या प्रकरणात ही पहिलीच सुनावणी असेल त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहण्याची गरज नाही. तरी देखील पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आता दोन्ही गटांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube