आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी…; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं

Prithviraj chavhan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavhan) म्हणाले की, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच भाजपचे नाव खासदार निवडून आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये असलाच पाहिजे. दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची […]

आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी...; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं

Prithviraj chavhan

Prithviraj chavhan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavhan) म्हणाले की, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच भाजपचे नाव खासदार निवडून आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये असलाच पाहिजे.

दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची वादात उडी

मात्र आंबेडकरांनी मतांची टक्केवारी आणि निवडून येण्याची क्षमता पाहून व्यावहारिक रित्या जागांची मागणी करावी. असे देखील चव्हाण म्हणाले. चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीमध्ये येण्याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी ते बोलत होते.

“माझी पिट्या… माझी पिट्या…” : धनंजय मुंडेंना आले प्रेमाचे भरते! नेमके गुपित काय?

त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेश आणि त्यांच्या एकंदरीत जागावाटपाच्या मागणीबाबत चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये ज्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह इतर पक्ष महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष देखील आमच्या सोबत असला पाहिजे, कारण प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास इंडिया आघाडीला छेद देण्यासाठी विरोधकांच्या मतांचं विभाजन होण्यासाठी भाजपला मदत होते.

सुषमा अंधारे कल्याणमध्येच शिंदेंची कोंडी करणार ? स्थानिक पदाधिकाऱ्यानेच आखला ‘प्लॅन’

तसेच प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीचे प्रमुख असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांना भेटावं किंवा पत्र लिहावं. कारण या अगोदर त्यांनी कुठल्यातरी प्रवक्त्याच्या माध्यमातून खरगेंना पत्र लिहिलं होतं. तो त्यांचा अपमान आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाला कुणाचाच विरोध नाही. पण त्यांनी मतांची टक्केवारी आणि निवडून येण्याची क्षमता पाहून व्यावहारिकरीत्या जागांची मागणी करावी असे देखील चव्हाण म्हणाले.

तसेच यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत येथीलच असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला .कारण प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, आप, एमआयएम यांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यास नुकसान कोणाचा होणार आहे? फायदा कोणाचा होणार आहे? हे स्पष्टच आहे. असं मत पृथ्वीराज चव्हणांनी व्यक्त केलं.

Exit mobile version