Download App

अजित पवारच मुख्यमंत्री होणार! पृथ्वीराज चव्हाणांनी थेट तारिखच सांगितली

Pruthviraj Chavhan : शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. मात्र यावेळी शिंदेंच्या आमदारांनी या निधी वाटरपामध्ये भेदभाव झाला नसल्याचं म्हटलं आहे. या निधीच्या मुद्द्यावर त्याचबरोबर गेल्याकाही दिवसांपूर्वी कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटले होते. त्यावर पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बोलले आहेत. ( Pruthviraj Chavhan Said Shinde MLA ineligible and Ajit Pawar will CM OF Maharashtra)

नगर जिल्हा विभाजनापूर्वीच ‘या’ गावाच्या विभाजनाचा वाद…

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की, अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे म्हणूनच ते त्यांच्यासोबत गेले आहेत. तसेच येत्या 10 ऑगस्टला राज्यात पुन्हा भूकंप होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चव्हाण म्हणाले की, पक्षांतर करण्यासाठी ज्या खोक्यांची चर्चा झाली त्यातील रक्कम ही आमदारांना विकासकामांच्या निधीतून देण्यात आली असल्याची चर्चा आहे. असं चव्हाण म्हणाले.

Ind Vs WI : वेस्टइंडिजसाठी अश्विन पुन्हा ठरणार डोकेदुखी; सिराजचे मोठे वक्तव्य

तसेच पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही त्याची माहिती काढत आहोत. असं चव्हाण म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी मला मिळालेल्या माहितीनुसार आणि राजकीय अभ्यासानुसार अंदाज वर्तवला होता की, अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे म्हणूनच ते त्यांच्यासोबत गेले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसबा अध्यक्षांना 90 दिवसांत म्हणजे 10 ऑगस्टच्या आसपास घ्यायला सांगितला आहे. तो त्यांना घ्यावा लागेल. त्यामुळे 10 ऑगस्टला त्यावर निर्णय घेईल. असा माझा अंदाज आहे.

त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदेंसह आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल तेव्हा तेव्हा त्यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही. त्यावेळी भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री करतील असा अंदाज माझा आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 2024 निवडणुका लढता येणार नाही हे भाजपला कळालेलं आहे. त्यामुळे ते अजित पवारांना पुढे करतील. असा अंदाज कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us