नगर जिल्हा विभाजनापूर्वीच ‘या’ गावाच्या विभाजनाचा वाद…

नगर जिल्हा विभाजनापूर्वीच ‘या’ गावाच्या विभाजनाचा वाद…

Ahmednagar : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अद्याप देखील जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघाच्या जामखेडमधील खर्डा गावाच्या विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान मागे झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेला विभाजनाचा ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलल्याने प्रलंबित राहिला. याचा निषेध म्हणून रविवारी खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या विषयावर आज सोमवारी (दि. 24) विशेष ग्रामसभाही वादळी ठरणार होती, मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.(Ahmednagar district division rohit pawar ram shinde Kharda village division demand jamkhed)

दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून काय मिळालं?, विधानसभेत पटोलेंचा आक्रमक पवित्रा…

शिवपट्ट्ण विकास युवा मंचच्या माध्यमातून एक राजकीय पार्श्वभूमी नसलेला ग्रुप खर्डा शहरात नुकताच तयार झाला आहे. त्यांनी एकत्र येऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. यातच सर्वात पहिले त्यांनी खर्डा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा मुद्दा समोर घेतला असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

सोमवारी खर्डा ग्रामपंचायतने ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे. तो ठराव रविवारी शहरात ठेवण्यात आलेल्या बंदमुळे मंजूर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान जामखेड तालुक्यातील खर्डा गाव हे मोठ्या लोकवस्ती आणि बाजारपेठेचे गाव आहे. राजकीय दृष्टीने कर्जत-जामखेड मतदारसंघात खर्डा गावाला विशेष महत्व आहे.

खर्डा येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत विभाजनाच्या ठरावाला आमदार राम शिंदेंच्या गटाने पाठिंबा दिला होता मात्र या गटातील सदस्यांनी भूमिका बदलली. त्यांच्या या भूमिकेचा निषेध म्हणून रविवारी खर्डा शहर बंद पुकारण्यात आला. दि.12 जुलै रोजी खर्डा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकूण 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 14 ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिला होता.

21 जुलै रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत आमदार राम शिंदे गटातील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षाअगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा विषय मांडला. त्याला आमदार रोहित पवार गटाच्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला.

या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव मासिक बैठकीत करावा अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक भूमिका बदलल्याच्या कारणामुळे खर्डा शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आज होणाऱ्या ग्रामसभेकडे तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube