दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून काय मिळालं?, विधानसभेत पटोलेंचा आक्रमक पवित्रा…

दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून काय मिळालं?, विधानसभेत पटोलेंचा आक्रमक पवित्रा…

Maharashtra Assembly Session : राज्यातल्या अनेक शाळा बंद असून दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून तुम्हाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे नेते नाना पटोले विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवरं धरलं जात आहे. अशातच आता नाना पटोलेंनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सगळ्याच गोष्टींवर बोट ठेवलं आहे.

Manipur : ड्रग्ज माफियाचं CM कनेक्शन? मुख्यमंत्र्यांनी टाकला होता दबाव.., महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप…

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यात शिक्षक भरती रखडली आहे. अशातच आता निवृत्त शिक्षकांना मानधन देण्यात येत आहे. त्यामुळे भावी शिक्षकांच्या मनात प्रचंड संताप उसळला आहे. राज्य सरकारने तातडीने शिक्षक भरतीबाबत धोरण जाहीर करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी राज्यातील शिक्षणव्यवस्थेबाबतही सडेतोडपणे भाष्य केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

राज्यातील आदिवासी, जंगली भागातल्या अनेक शाळा राज्य सरकारकडून बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील आदिवासी आणि दलितांचं शिक्षण हिसकावून घेत तुम्हाला काय मिळालं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

इर्शाळवाडी दरड प्रकरण महाराष्ट्राची बदनामी :
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी भागांत दरड कोसळून एक गावचं नकाशातून हटलं आहे. त्या ठिकाणच्याही शाळा बंद आहेत. या गावात आपण साधी लाईटही देऊ शकलो नाही, नीट रस्तेही दिलेले नाहीत. इर्शाळवाडी घटनेची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून महाराष्ट्राची बदनामी असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात बंद असलेल्या शाळा, शिक्षक भरतीचं धोरण आणि क्रीड संकुलाला भरघोस निधी देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube