Download App

पुण्यातील आमदार तुपे, टिंगरे नेमके कुणाबरोबर ? दोघांची राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी !

  • Written By: Last Updated:

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडले आहेत. अजित पवार व शरद पवार गटामध्ये आता जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात येत आहेत. तसेच दोन्ही गटाकडून बैठका आयोजित करण्यात आली होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे. (pune-mla-chetan-tupe-and-sunil-tingre-absent-city-ncp-meeting)

या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण ठराव संमत केले आहेत. यात प्रामुख्याने खासदार शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार श्री. जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, कमलनानी ढोले, अंकुश काकडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LetsUpp Special :मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये

पुणे शहर व ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे व हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे हे आमदार आहेत. शहरातील बैठकीला हे दोन्ही आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यात आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांबरोबर गेलेले आहेत. चेतन तुपे हे शरद पवारांबरोबर असल्याचे बोलले जात आहे. सुनील टिंगरे हे अजित पवारांबरोबर असल्याने ते या बैठकीला उपस्थित नव्हते. परंतु चेतन तुपे हे शरद पवारांबरोबर असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यांनीही बैठकीला दांडी मारली आहे.


Photo’s : उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मंत्रालयात; मंत्रिमंडळ बैठकही पार पडली

अजित पवारांबरोबर की शरद पवारांबरोबर राहायचे याबाबत अनेक आमदारांमध्ये संभ्रम आहेत. त्यामुळे हे आमदार मतदारसंघात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची भेटी घेत आहेत. त्यामुळे सध्या तरी काही आमदार हे दोन्हीकडील बैठकीला जाण्यास टाळत असल्याची राजकीय चर्चा आहे.

Tags

follow us