‘काट्याने घड्याळ काढलं’; राज ठाकरेंची पुण्यातून टोलेबाजी

‘काट्याने घड्याळ काढलं’; राज ठाकरेंची पुण्यातून टोलेबाजी

Raj Thackeray On Ajit Pawar :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अजित पवारांंनी केलेल्या बंडावर आपले मत व्यक्त केले आहे. चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटला असून कोणत्या सोंगट्या कुठे आहे, ते सांगता येत नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल ही मंडळी संशयास्पत वाटतात, असेही ते म्हणाले.

जे झालय ते अत्यंत किळसवानं झालेलं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही. याची  सुरुवात शरद पवार यांनी  1978 साली केली होती. त्याचा शेवट आता त्यांच्यावरच होतो आहे.

अजितदादांचं बंड होणार हे माहित होत पण… रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

जे काही घडलेलं आहे असं यापूर्वी राज्यात कधी घडलं नाही. राज ठाकरे म्हणाले की, अशा गोष्टी अचानक घडत नाही. हे सगळं फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. या सर्व घडामोडींमध्ये संशय घ्यायला जागा आहे. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यता राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे ते म्हणाले.

NCP Crisis : ‘पवार साहेबांना त्रास होतोय’; भेटायला आलेल्या आव्हाडांचे डोळे पाणावले

तसेच चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटला असून कोणत्या सोंगट्या कोणत्या भोकात आहे, ते सांगता येत नाही. घडाळ्याने काटे फिरवले की काट्याने घड्याळ फिरवलं ते न सांगता येणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंशी युतीबाबत चर्चा झाली असे विचारले असता असं काही बैठकीत झालं नसल्याचे म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube