अहमदनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील शीतयुद्ध काही केल्या थांबेना. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषथीय केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याच मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांना शाब्दिक टोला लगावला. पक्ष फुटला तर आता तुम्हाला तुमच्या सुनाही परक्या वाटू लागल्या का? असा खोचक सवाल विखेंनी केला.
विशाल पाटील लढले तर पाठिंबा देऊ…; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं!
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभेत ठीक-ठिकाणी भेटी देत आहेत. केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती देखील ते या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.
नुकतेच शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, सुनेत्र पवार यांच्यावरती केलेले वक्तव्य आदरणीय शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नव्हते. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालू असते. पक्ष फुटल्याचं तुम्ही खूपच जास्त मनाला लावून घेतलं आहे. त्यामुळं आता तुम्हाला तुमच्या घरातल्या सुना देखील परक्या वाटू लागल्या आहेत. शरद पवार यांचे वक्तव्य हे दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, अशा शब्दात विखेंनी पवारांवर टोला लगावला.
दात पडलेला अन् नखं वाढलेला शक्तीहीन वाघ; पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
रोहित पवारांनी ७० टक्क घराणेशाहीवाले खासदार भाजपमध्ये असल्याची टीका केली होती. यावरही विखेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, रोहित पवारांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. तुम्हाला ही संधी कोणामुळं मिळाली? घराणेशाहीमुळंच तुम्हाला लोकांनी स्वीकारल्याचं विखे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बारामतीच्या प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत तुम्ही वडिलांना म्हणजे, पवार साहेबांना मत दिल. मुलाला म्हणजे, मला आणि मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सूनेला मतदान करायचं, ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल, त्या ठिकाणी मतदान करा, असं आवाहन अजितदादांनी केलं. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचे मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असे शरद पवार म्हणाले.