पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येतंय, हे वेळेत ओळखलं दिसतंय; विखेंची शरद पवारांवर बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil-त्यांच्या पक्षाकडे माणसांच राहिलेले नाहीत. कोणाशी युती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Radhakrishna Vikhe On Sharad Pawar

Radhakrishna Vikhe On Sharad Pawar

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) काही ठिकाणी आघाडी झालीय. कोल्हापूरमधील चंदगडमध्येही अशी आघाडी झालीय. या निवडणुकीसाठी शरद पवार व अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून जलसंपदामंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) बोचरी टीका केलीय. त्यांच्या पक्षाकडे माणसं नाहीत. त्यामुळे ते दुसरा पर्याय शोधत असल्याचे विखे म्हणाले.

बिहार विधानसभेचा निकालानंतर लालू प्रसाद यादवांच्या घरात वादळ; तीन मुलींनी घर सोडलं


कोणाशी युती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही-विखे

विखे म्हणाले, त्यांच्या पक्षाकडे माणसांच राहिलेले नाहीत. कोणाशी युती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येतंय. त्यांनी हे वेळेत ओळखले दिसतंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विखेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, शरद पवार यांच्यावर टीका करणे राधाकृष्ण विखेंची पात्रता आहे का ? सत्तेसाठी तत्व, निष्ठा गहाण ठेवून भाजपमध्ये गेलेले आहेत. अहिल्यानगरमध्ये लोकसभा निवडणुकीला पवारांनी विखेंना आपली ताकद दाखविलेली आहे. (Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar ncp)


राजकारण तापले ! अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीमध्येच दोस्तीत कुस्ती, मनसेची साथ महाविकास आघाडीला

आमचं नाणं खणखणीत

सुप्रिया सुळे यांनी विखे यांच्या टीकेला संयमाने उत्तर दिले. आमच्यावर टीका केली जात आहे. याचा अर्थ शरद पवार यांचं नाणं खणखणीत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. विखे आणि शरद पवार यांच्यामध्ये गेल्या तीन पिढ्यापासून राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे विखे यांच्या नव्या टीकेमुळे या दोघांमध्ये पुन्हा एक नवीन राजकीय अंक रंगण्याची शक्यता आहे.

Exit mobile version