Download App

राहुल गांधी देशाची निंदा करतात, त्यांचा पासपोर्ट रद्द करावा; रामदास आठवलेंची मोठी मागणी

Ramdas Athawale: राहुल गांधी हे आरक्षण संपणार असे म्हणत असतील तर काँग्रेस पक्ष संपेल पण आरक्षण संपणार नाही.

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale On Rahul Gandhi : केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर थेट टीका केलीय. राहुल गांधी हे देशाबाहेर जावून आपल्या देशाची निंदा करतायत. त्यामुळे राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द केला पाहिजे, अशी मागणीच आठवले यांनी केलीय.


ICC ने केली मोठी घोषणा, पुरुष आणि महिलांना मिळणार समान बक्षीस रक्कम

रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी हे आरक्षण संपणार असे म्हणत असतील तर काँग्रेस पक्ष संपेल पण आरक्षण संपणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी सरकार आले तर संविधान, लोकशाही धोक्यात येईल, असा प्रचार करणारे राहुल गांधी आणि त्यांचे लोक आता आरक्षण संपुष्टात येईल, असे म्हणत आहेत. पण आरक्षण संपुष्टात येणार नाही. राहुल गांधी हे विदेशात देशाची निंदा करत आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत.

‘लोकांना माझ्या पूजेची अडचण…’, पंतप्रधान मोदींचे ‘गणेश आरती’ वरून काँग्रेसला प्रत्युत्तर

आपल्याला माहीत असेल की राहुल गांधी हे बोलले म्हणजे आरक्षण संपुष्टात येणार नाही. त्यांचे सरकारही येणार नाही. त्यांनी चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडली पाहिजे. बाहेर जावून त्यांनी देशाची निंदा करू नये. देशाबाहेर जावून देशाविषयी ते काहीही बोलत आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द केला पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केलीय.

राज ठाकरेंना महायुतीत घेण्यास आठवलेंचा विरोध
राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्याबाबत रामदास आठवले यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केलीय. अजित पवार हे महायुतीमध्ये आल्याने काही नुकसान झालेले नाही. त्यांचा फटका महायुतीला बसलेला नाही. महायुतीला लोकसभेला सतरा जागा मिळाल्यात. संविधानाच्या प्रचाराचा फटका महायुतीला बसला आहे. राज ठाकरे हे लोकसभेला आमच्याबरोबर आले. परंतु त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे विधानसभेला त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये, असे सांगत आठवले यांनी राज ठाकरेंना विरोध दर्शविला.

follow us