अजित पवार भाजपासोबत जाणार? रामदास आठवले म्हणाले…

अजित पवार भाजपासोबत जाणार? रामदास आठवले म्हणाले…

Ramdas Athawale On Ajit Pawar : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्यापेक्षा भाजपा सोबत जाण्याची भूमिका अजित पवार घेऊ शकतात. तसा अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा अनुभव देखील आहे. येत्या काळात काहीही होऊ शकत. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आरपीआयचें प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करून ते कर्नाटकात भाजपचा प्रचार करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

शरद पवारांनी राजीनामा दिला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देशाच्या पातळीवर काम करणारा नेता दिसत नसल्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा असा टोला यावेळी आठवलेंनी लगावला.

अजित पवार 40-42 आमदार घेऊन भाजपा सोबत येणार अशी चर्चा मध्यंतरी होती. मात्र शरद पवार म्हणत होते मी भाजपा सोबत जाणार नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं अशी भूमिका ते मांडत होते. शरद पवारांच वय झालं आहे. त्यांची तब्यत ही ठीक नसते हे त्यांच्या राजीनाम्याच कारण असू शकत. जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले आणि अजित पावर भाजपासोबत येणास उत्सुक असतील तर त्यावेळी त्यांचं स्वागतच करू असे आठवले म्हणाले

https://letsupp.com/politics/maharashtra-abhijeet-patil-president-of-vitthal-sugar-factory-joins-ncp-43382.html

कर्नाटक निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणतात कर्नाटकमध्ये भाजपची टक्कर ही काँग्रेस सोबत आहे. काँग्रेसने कितीही खेळ केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि मागील 9 वर्षाच्या कामाच्या जोरावर कर्नाटकात भाजप सत्तेवर येणा. रिपब्लिकन पार्टी कर्नाटकात ताकदीने भाजपासोबत उभे आहेय. त्यामुळं कर्नाटकातील दलित मतदार हा भाजपा सोबत असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube