‘लोकांना माझ्या पूजेची अडचण…’, पंतप्रधान मोदींचे ‘गणेश आरती’ वरून काँग्रेसला प्रत्युत्तर
PM Modi on CJIs House Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या घरी जाणून गणेश पूजा केल्याने देशाचा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (ठाकरे गट) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
माझ्या गणेश पूजेबाबत काही लोकांना समस्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांना पूजेची अडचण आहे. गणेशपूजेत माझ्या सहभागामुळे काँग्रेस आणि त्यांच्या ‘इकोसिस्टम’ ला अडचण होत असल्याची टीका मोदींनी ओडिशातील भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सत्तेच्या आहारी गेलेल्या लोकांना आणि त्यांच्या इको सिस्टीमला गणेश पूजेची अडचण होत आहे. या लोकांनी कर्नाटकात गणेशमूर्तीला तुरुंगात टाकले. अशा द्वेषी शक्तींना आपण पुढे जाऊ देऊ नये असे आवाहन देखील काँग्रेसवर टीका करताना त्यांनी केला.
#WATCH | Bhubaneswar, Odisha: PM Modi says, “The country is celebrating Hyderabad Mukti Divas today… At the time of independence, the opportunists were ready to break India into pieces to gain power… Sardar Patel came forward and united the country… He controlled the… pic.twitter.com/rzzliLryDr
— ANI (@ANI) September 17, 2024
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशासाठी गणेशोत्सव फक्त श्रद्धेचा उत्सव नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे मात्र आज देखील समाजात फूट पडणाऱ्या लोकांना गणेशोत्सवाची समस्या आहे. जेव्हा इंग्रज देशाचे तुकडे पाडण्यात मग्न होते, जातींच्या नावावर देशाला भांडायला लावत होते, तेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक कार्यक्रमांतून भारताचा आत्मा जागवला होता.असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोठी बातमी! बुलडोझर कारवाई बंद होणार, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील CJI चंद्रचूड यांच्या अधिकृत निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बापाची आरती केली होती. त्यांच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यानंतर पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे योग्य आहे की नाही? यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. काँग्रेससह शिवसेनाने पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.