Modi Mimicry in Chhatron Ki Goonj Controversy: काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नक्कल केल्याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी (Pulkit Mani) याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची आणि काही प्रसंगांची नक्कल केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही (Rahul Gandhi) मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
19 सप्टेंबरला इंदूरमध्ये काँग्रेसच्या वतीने ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संवाद आणि शिक्षण, रोजगार, भरती तसेच परीक्षांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी याने राहुल गांधींसोबत मंचावर येत नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली.
पुण्यातील व्यावसायिक गर्लफ्रेंडसोबत फॉरेन ट्रिपला निघाला, पत्नीला सांगितलं खोटं; फोन बंद झाला अन्
पुलकित मणी याने मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल करत वारंवार ‘माय फ्रेंड’ या मोदींच्या प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा वापर केला. मोदी यांच्या परदेशी नेत्यांसोबतच्या संवादशैलीसह काही सार्वजनिक प्रसंगांचाही या विनोदी सादरीकरणात संदर्भ देण्यात आला. तर राहुल गांधी या सादरीकरणादरम्यान हसताना दिसले, याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
वृद्ध महिलेच्या प्रसंगावरून भाजपचा आक्षेप
या मिमिक्रीमध्ये नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान एका वृद्ध महिलेसाठी खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलेल्या प्रसंगाचीही पुलकीतने नक्कल केली. भाजपने याच मुद्द्यावर आक्षेप घेत राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपच्या मते, या सादरीकरणातून वृद्ध महिलेचा अवमान करण्यात आला आणि राहुल गांधी त्या प्रकारावर हसताना दिसले. मात्र, हा भाजपने केलेला आरोप आहे; काँग्रेसने या घटनेकडे राजकीय व्यंग आणि कार्यक्रमातील विनोदी सादरीकरणाचा भाग म्हणून पाहिले आहे.
भाजपने सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट
भाजपच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर करण्यात आला. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृद्ध महिलेला सन्मान दिल्याचे सांगत, त्याच प्रसंगाची राहुल गांधींच्या कार्यक्रमात खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने या घटनेला राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दा बनवत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
एक तरफ़ पीएम मोदी ने एक बुज़ुर्ग माँ को सम्मान और अपनापन दिया, दूसरी तरफ़ राहुल गांधी ने अपने कार्यक्रम में उनका मज़ाक उड़ाया।
यही फर्क है संस्कार और दिखावे की राजनीति में। जिस उम्र में सम्मान मिलना चाहिए, वहाँ राहुल गांधी का यह शर्मनाक रवैया उनकी सोच के बारे में क्या कहता है?… pic.twitter.com/wLMXVReASY
— BJP (@BJP4India) September 19, 2026
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एका बाजूला भाजपने या सादरीकरणावर आक्षेप घेत राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि भरती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करणे हा होता. त्यामुळे मिमिक्रीचा हा व्हिडिओ आता कार्यक्रमातील राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
