स्मृती मंधानाचा विक्रमांचा ‘चौकार’; महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम

Smriti Mandhana T20I cricket : स्मृती मंधानाने बांगलादेशविरुद्ध 37 धावांची खेळी करत महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 20T162346.237

Smriti Mandhana : एशियन गेम्स 2026 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या (Cricket) उपांत्य सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने आक्रमक फलंदाजी करत महिला T20I क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. मंधानाने 19 चेंडूत 37 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अर्धशतकापासून ती हुकली असली तरी या खेळीच्या जोरावर तिने महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

मंधानाच्या नावावर आता 178 T20I सामन्यांत 4788 धावा जमा झाल्या आहेत. तिची फलंदाजीची सरासरी 30.69 इतकी आहे. आतापर्यंत तिने T20I क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंडची माजी अष्टपैलू खेळाडू सूझी बेट्सच्या नावावर होता. बेट्सने 186 सामन्यांत 4758 धावा केल्या आहेत. जून 2026 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

शफाली वर्माचा विक्रमी शतकी धडाका; बांगलादेशला नमवत भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या नावावर 209 सामन्यांत 4327 धावा असून तिने 1 शतक आणि 18 अर्धशतके केली आहेत. या यादीत श्रीलंकेची चमारी अटापट्टू 4282 धावांसह चौथ्या, तर न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन 3817 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे या विक्रमाच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 2 खेळाडू आहेत.

बांगलादेशविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मंधाना आणि शेफाली वर्माने संघाला धडाकेबाज सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी पावरप्लेमध्ये 72 धावा जोडल्या. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सलग 2 चौकार लगावत मंधानाने सूझी बेट्सचा विक्रम मागे टाकला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये चौकार, षटकार आणि चौकार अशी सलग फटकेबाजी करत तिने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. मात्र, सहाव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ती डीप मिडविकेटवर झेलबाद झाली.

follow us