चक दे इंडिया ! पुरुष संघाने मलेशियाचा धुव्वा उडवत थेट ऑलिम्पिकचे तिकीट काढले

भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी 2026 एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Indian Men’s Hockey Team Wins Gold at Asian Games 2026

Indian Men’s Hockey Team Wins Gold at Asian Games 2026: भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी 2026 एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह भारताने पहिल्यांदाच एशियन गेम्समधील हॉकीचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा कायम राखले. तसेच या विजयामुळे भारताने 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळवली.

200 कोटींची ऑफर; ‘गोकुळ घशात घालण्याचा प्रयत्न’, सतेज पाटलांचा हल्लाबोल!

एशियन गेम्समधील भारताचे हे हॉकीतील पाचवे सुवर्णपदक ठरले. विशेष म्हणजे 2026 च्या या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारतीय महिला संघाने चीनचा पराभव करत 44 वर्षांनंतर एशियन गेम्समध्ये हॉकीचे सुवर्णपदक पटकावले होते. कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-3 असा रोमांचक पराभव केला होता.

मलेशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्याच क्वार्टरमध्ये आघाडी घेतली. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताचे खाते उघडले. मात्र, अवघ्या तीन मिनिटांत मलेशियाने गोल करत बरोबरी साधली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा आघाडी मिळवली. शिलानंद लाक्राने बॉक्समध्ये शानदार धाव घेत भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. हार्दिकने इंजेक्शनवर चांगला स्टॉप केल्यानंतर जुगराजने अचूक फटका मारत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक

यानंतर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. चेंडू गोलरक्षकाच्या डाव्या बाजूच्या खेळाडूकडे वळवण्यात आला. चेंडू पोस्टजवळ उभ्या असलेल्या मलेशियन खेळाडूला लागल्याने पंचांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. हार्दिक सिंहने ही संधी साधत गोल केला आणि भारताची आघाडी 3-1 अशी केली.

चौथ्या क्वार्टरमध्ये शिलानंद लाक्राने आणखी एक गोल करत भारताची आघाडी 4-1 वर नेली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ड्रॅग फ्लिकच्या माध्यमातून आपला दुसरा गोल नोंदवत भारताला 5-1 असा दणदणीत विजय मिळवून दिला.

‘डेथ कॅप मशरूम’ काय आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विषारी मशरूमचा उल्लेख का?

या सुवर्णपदकासह नागोया एशियन गेम्समध्ये भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या 21 वर पोहोचली. त्यामुळे भारताने पदकतालिकेत उझबेकिस्तानला मागे टाकत चौथे स्थान गाठले.

भारतीय हॉकीसाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे. एकाच एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

follow us