Download App

राहुल गांधी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार? विरोधकांची ‘वज्रमुठ’ मजबूत

Rahul Gandhi and Uddhav Thackeray meet : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे समोर आले आहे. हे मतभेद दुर करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होताना दिसत आहेत. याच कारणाने काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधींच्या भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या भेटीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमधील मतभेद दुर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

भाजपला कर्नाटकात झटका, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. हिंडेनबर्ग प्रकरणात उद्योजक गौतम अदानी यांची शरद पवार यांनी बाजू घेतल्याने काँग्रेस व इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीत विरोधकांची एकजुट मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोन दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. सर्व विरोधकांनी देशासाठी एकत्र यावे, असे आवाहन नितीशकुमार यांनी केले होते. त्यानंतर नितीशकुमार यांनी सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांची भेट घेतली होती.

Tags

follow us