Download App

ठाकरे गटाला गळती सुरूच! आदित्य ठाकरेंचे खास असलेले राहुल कनाल शिंदे गटात जाणार

  • Written By: Last Updated:

Rahul Kanal : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. (Rahul Kanal who is close to Aditya Thackeray will join the Shinde group)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

आदित्य ठाकरे 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्याच दिवशी त्यांना शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोर का झटका दिला जाणार आहे. आदित्य यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य असलेले राहुल कनाल 1 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल हे उद्योजक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना राहुल हे शिर्डी देवस्थान समितीचे सदस्य होते. कनाल हे मुंबई महापालिकेचे स्वीकृत सदस्यही होते.

आई-वडील म्हणाले ‘धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसला…’ आषाढीनिमित्त प्रविण तरडेंची खास पोस्ट 

हाती आलेल्या माहितीनुसार, राहुल कनाल यांच्या घरावर सीबीआयने गेल्या वर्षी छापा टाकला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. त्यांनी महिनाभरापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला होता. तेव्हापासून ते युवासेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल हे ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याचं बोलल्या जातं आहे.

 

Tags

follow us