आई-वडील म्हणाले ‘धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसला…’ आषाढीनिमित्त प्रविण तरडेंची खास पोस्ट

आई-वडील म्हणाले ‘धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसला…’ आषाढीनिमित्त प्रविण तरडेंची खास पोस्ट

Aashadhi wari 2023 : पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची वारकऱ्यांची ओढ काही न्यारीच असते. त्यासाठी कित्येक दिवस वारकरी पायी वारी करत विठूरायाच्या चरणी लीन होतात. वारकऱ्यांना एखाद्या वर्षी देखील वारी चूकवावी वाटत नाही. अगदी स्पर्श करून पांडूरंगाच दर्शन घेता येत नाही मात्र ते नित्यनेमाने पंढरपूरला जातात. अशीच दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे दिग्दर्शक प्रविण तरडेंचे आई वडील त्यांच्याबद्दल आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट केली आहे. ( Director Pravin Tarade post on Aashadhi Ekadashi for mother and father )

भारत विरुध्द पाकिस्तान सामना भारतात होणार; शिंदे गटाचे उदय सामंत काय म्हणाले?

काय आहे प्रविण तरडेंची पोस्ट?
काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय.? तुम्ही म्हणाल तिथं घेऊन जातो. म्हणाल त्या देशात. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल, मी म्हणालो पंढरपूर का ..? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं. धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा. जरा निरखून पहायचाय.

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात कारवाई करणारच; फडणवीसांनी ठाकरेंना घेरले

मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं .. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं. वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा

ही पोस्ट प्रविण तरडेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांनी कशा प्रकारे पंढरपूरच्या पांडूरंगाचं दर्शन घेतलं हे सांगितलं. तसेच त्यांनी यामध्ये पांडूरंगाचं दर्शन घेतानाचा फोटो देखील त्यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रविण तरडेंचे आई-वडिल अगदी जवळून पांडूरंगाचं दर्शन घेताना दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube