Download App

Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील भाषणातून उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात कितीतरी प्रश्न आहेत. सामान्य जनता सरकारकडे बघते आणि हे सरकार कोर्टाकडे पाहतं. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदा पाहिलं, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारव केली.

राज ठाकरे म्हणाले, माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढच सांगण आहे की, उद्धव ठाकरे यांनी जिथं सभा घेतल्या. तिथं त्यांच्या मागे जाऊन तुम्ही सभा घेऊ नका. तर महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. कितीतरी प्रश्न महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. ते प्रश्न आधी मिटवा. सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप केला. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडून सभा काय घेत बसला? असा खोचक टीका राज ठाकरेंनी केली.

माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम; राज ठाकरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट.. 

ते म्हणाले, राज्यात नवीन उद्योग येत नाहीत. बेरोजगारी वाढतेय. शेतकरी, महिला, विद्यार्थी सरकारी कर्मचारी यांचे कितीतरी प्रश्न आहेत. हे सगळे घटक सरकारडे बघतात आणि सरकार कोर्टाकडे बघते, कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार असं सरकार मी आजवर बघितलं नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. अलीबाबा आणि त्यांचे 40 जण शिवसेना सोडून गेले. त्यांना फक्त चोर म्हणता येत नाही. कारण ते चोर नाहीत. उद्धव ठाकरेंच्या स्वभामुळेच 40 आमदार ठाकरेंना सोडून गेले. कोरोनाकाळात हा माणूस कुणालाही भेटत नव्हता, आणि आता शिवसेना हातातून गेल्यावर त्यांना जाग आली.

ते म्हणाले, 2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली. आणि निवडणूका झाल्यावर जे भाजप-सेना सरकार येणार असं निश्चित झालं, तेव्हा ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार हे भाजपनं कबूल केलं होतं, असं सांगितलं. आणि शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली. जर आपण भाजपसोबत गेलो नाही तर भाजपचं सरकार येणार नाही, हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस सोबत – राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. याचा मतदारांनी विचार करायला हवा. मतदारांसाठी कॅम्पेनिंग केलं जातं. त्यांना सांगितलं जातं की, मतदान करा. त्यांनी त्यांच कर्तव्य नीट पार पाडल्यावर हे लोक सत्तेचा खेळ खेळत राहणार. ह्यांनी सत्तेची थेर करता यावी, यासाठी तुम्ही मतदान करता का? असा सवाल त्यांनी उपस्थितांनी केला.

आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. ज्या महाराष्ट्रानं जगाचं प्रबोधन केलं. त्या महाराष्ट्राचं आता प्रबोधन करायची वेळ आली. महाराष्ट्र आज चाचपडतोय, आज हे गेले, उद्या ते गेले, कशा प्रकारचं राजकारण करतो आपण? राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या की, कुणाच्या तोंडात शेण घालाचयं अन् कुणाच्या हातात सत्ता द्यायची, असं राज ठाकरे म्हणाले.

follow us