माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम; राज ठाकरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट..

माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम; राज ठाकरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट..

Raj  Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. हे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम जर  एका महिन्यात पाडले नाही  तर त्याच्या बाजूला आम्ही गणपती मंदिर उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज  ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भाषणात माहिमच्या समुद्रातील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की एकदा माहिमच्या समुद्रात गर्दी दिसली. त्यावेळी एका जणाला विचारले  की ही कशाची गर्दी आहे. त्यानंतर त्याने मला ड्रोनचे फुटेज पाठवले. त्यानंतर येथे हे बांधकाम सुरू असल्याचे लक्षात आले. हे बांधकान जेथे सुरू आहे तेथून पोलीस स्टेशनही जवळ असल्याचे ठाकरे म्हणाले.

वाचा : Raj Thackeray जनतेच्या मनातील भावी ‘मुख्यमंत्री’ मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका

या बांधकामावरून त्यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, माहिमच्या समुद्रात मागील दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. यावर जर महिनाभरात कारवाई केली गेली नाही तर त्याच्या बाजूलाच सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा त्यांनी भाषणात दिला. या प्रकरणी जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर याद राखा असे  आव्हान द्याायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

शिवधनुष्य बाळासाहेबांनाच पेलवले, एकाला तर झेपलेच नाही; चिन्हाच्या वादावर राज ठाकरे बोलले..

भाषणादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही सडकून टीका केली. आज राजकारणाचा जो बट्ट्याबोळ झाला आहे. ठाकरे गटाकडून जे राजकारण केले जात आहे याचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेले या मुद्द्यावरही त्यांनी सभेत भाष्य केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube