Download App

जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत….; राज ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खड्ड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही. आणि जोपर्यंत जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं म्हणत त्यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलतांना म्हणाले की, शहरात खड्डे पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडले आहेत. पण कोणालाच याचं काही पडलं नाही. मला वाटते की तुम्ही ज्या लोकांना निवडून देत आहात, त्यावर विचार करणं गरजेचं आहे. जनतेचंही आश्चर्य वाटतं की, ही लोक काम करत नाहीत, तरीही तुम्ही त्यांना कसं निवडून देता? असा सवाल करत जोपर्यंत जनतेच्या मनातील राग मतपेटीतून दिसत नाही, तोपर्यंत खड्डे पडणं बंद होणार नाही, असं ते म्हणाले.

Ghoomer Review:’क्रिकेटच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी’, पाहा रिव्ह्यू… 

ते म्हणाले, पुण्यात सात शहरं वसली आहेत. पुणे कुठून कसं पसरतंय याची कुणालाही कल्पना नाही. पुण्यात सध्या फक्त केवळ मतदार वाढवण्याचं काम सुरू आहे. शहराच्या टाऊन प्लॅनिंगची कोणालाही काही काळजी दिसत नाही. शहरात टाऊन प्लॅनिंग असे काही असते हे कोणालाच माहीत नसावं, अशी शंका येते. मात्र, प्रत्येक शहराची रचना वेगळी असते. त्या रचनेनुसार आणि लोकसंख्येनुसार शहराच्या गरजा असतात. रुग्णालयं, शाळा, कॉलेज, मार्केट हवं असतं. सोबतच नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होईल, अशी परिसराची रचना असायला हवी. त्यामुळं लोकसंख्या वाढतांना प्रत्येकवेळी याचा विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी लांबलेल्या निवडणुकांवरही भाष्य केलं. राज्यात कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा ते निवडणुका घेतील, असं ठाकरे म्हणाले.

Tags

follow us