Download App

मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा, भेटीदरम्यान राज ठाकरेंची सामंतांना तंबी?

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय.

मिशन टायगरच्या निशाण्यावर मनसे असल्याची माहिती (Maharashtra Politics) मिळतेय. पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उदय सामंत यांनी फोन करुन शिवसेनेत येण्याच्या ऑफर दिल्या होत्या. यापैकी काहींना महामंडळ देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय. शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर यासंदर्भात एक बैठक देखील झाली होती.

मुंडे-कोकाटेंचा राजीनामा…अण्णा हजारेंच्या मागणीवर सरकारचा निर्णय, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

ही माहिती (Mission Tiger) राज ठाकरे यांना समजली. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी संबंधित जिल्हाध्यक्षांसोबत राज ठाकरेंनी बैठक देखील घेतली. आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीयेय पुढचा निर्णय तुमचा आहे, असं राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितले. त्यानंतर या सर्व जिल्हाध्यक्ष आणि मनसेतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना आज बोलावून घेतलं. सामंतांना या संदर्भात जाब विचारल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने मिळतेय.

Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?

मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा, असं राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना स्पष्ट सांगितल्याची माहिती मिळतेय. तर उदय सामंत यांनी आज राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीवर बोलताना म्हटलंय की, आजची भेट ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती. राज ठाकरेंसोबत गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानात देखील भर पडत असते. कारण त्यांच्या भाषणाची शैली, वकृत्व वेगळे आहे. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते, त्यामुळे तशाच पद्धतीने या भेटीकडे बघितलं तर बरं होईल असे सामंत म्हणाले.

 

follow us