Download App

थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’

  • Written By: Last Updated:

मुंबई : कालच्या आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माहिम येथील दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. आणि तिथं हाजी अली दर्गा तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज या अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम काढून टाकण्यात आलं. दरम्यान,यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. माहिमचं प्रकरण आणि राज ठाकरेंची सभा ही स्क्रिप्टेड मॅच होती, अशी टीका त्यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनी एक जिल्हाधिकाऱ्यांच पत्र दाखवत ही मॅच स्क्रिप्टेड होती. यावर पत्रावरची तारीख दाखवत ते म्हणाले की, या पत्रावर पोलीस बंदोबस्त कधी घ्यावी याची तारीख लिहिलेली आहे. ही तारीख 23 मार्च आहे. आणि वरची तारीख 22 हाताने लिहिलेली आहे. याच दर्ग्याविषयी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतांना सामनाच्या पहिल्या पानावर ही बातमी छापून आली होती.

विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’

आता लोकाच्या लक्षात आलं की, राज ठाकरेंच्या भाषणाने कोणी भडकतही नाही, आणि भडकवतीही नाही. ते एक गोंधळलेलले राजकारणी आहेत. ते कधी शिंदेंच्या बाजून बोलतात. कधी यांच्यावर टीका करतात. कधी त्यांच्यावर टीकार करतात. घरच्या गप्पा मारण्याठी तुम्हाला कशाल हवं, शिवाजी पार्क? असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरेंवर टीका करतांना आव्हाड म्हणाले की, काल त्यांना कुणीतरी सांगितलं की, तुम्ही हा मुद्दा तुमच्या भाषणात हा मुद्यावर बला. मग दुसऱ्या दिवशी ही मझार पाडण्यात येईल. आणि याचं क्रेडीट तुम्हाला मिळेल. तुमची हवा होईल. पिक्चरमध्ये जशी स्क्रिप्ट लिहून देतात आणि सांगतात की, तू हे डॉयलॉग घे. तसचं राज ठाकरेंनी केलं. त्यांना कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली.

पत्रकरांनी स्क्रिप्ट रायटर कोण आहे, असं विचारताच आव्हाड म्हणाले की, स्किप्ट रायटरही कोण होतं, हेच मीच सांगाचयचं तर तुम्ही काय करणार? असा उलट सवाल पत्रकारांना केला.

Tags

follow us