विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’

विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’

मुंबई : आज विधानसभेत शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. लक्षवेधीवर चर्चा सुरू असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात हजर नव्हते. मात्र खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडून उत्तर हवं, असा आग्रह केला. त्यावर गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झाले. प्रत्येक वेळेस कशाला हवेत मुख्यंमंत्री? आम्ही उत्तर देतो आहोत ना? उगाच चार वेळा निवडून आलो नाही, अशा शब्दात खडसेंना सुनावलं.

आज विधानसभेत खडसे यांनी पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांन शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या विषयाची लक्षवेधीची सूचना सभापती निलम गोऱ्हेंकडे केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. दरम्यान, खडसे यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं, अशी मागणी केली. खडसे यांनी मुख्यमंत्री हे वारंवार सभागृहात गैरहजर राहतात. त्यामुळे इतर मंत्र्यांकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही, ही बाब खडसे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर गुलाबरव पाटली चांगलेच भडकले.

पाटील म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्र्याकडूनच उत्तर पाहिजे होतं, तर मग सभापतींना तसं कळवायचं असतं. प्रत्येकवेळी कशाला हवेत मुख्यमंत्री. मी उत्तर देत आहे ना… माझ्या उत्तरानं तुमचं समाधान होत नसेल तर तर प्रश्न राखून ठेवा. आम्ही काय उगाज चार वेळा निवडून आलो का? अशा शब्दात खडसेंचा समाचार घेतला.

Hindenburg Research : हिंडेनबर्गचा मोठा धमका, अदाणीनंतर ट्विटरच्या माजी संस्थापकावर केले धक्कादायक आरोप

पाटील म्हणाले, आणि या प्रश्नावर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही.

तर खडसे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतला निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिला नाही. हायकोर्टाने दिला आहे. आणि हायकोर्टाच्या निर्णयविरोधात सुप्रीम कोर्टातजातं येतं. धरणांमध्ये जमीनी जातात आणि सरकार कोर्टावर ढकलत असेल तर याला पर्याय नाही. आम्ही विनंती करतो की, मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं. मात्र, विधानपरिषदेत मुख्यमंत्री येत नाहीत. ते फक्त विधानसभेत हजेरी लावतात. त्यामुळं वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांवर अन्यांय होतो. आणि मुख्यमंत्र्यांकडून आवडता -नावडता असा काही प्रकार सुरू आहे की काय,अशी शंका येते.असा टोला खडसेंनी लगावला.

दरम्यान, निलम गोऱ्हे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत वातावरण शांत केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube