Rajasthan politics: भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक जुने आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia ) यांचाही नंबर लागण्याची परिस्थिती निर्माम झाली आहे. गेल्या दोन दशकात राजस्थानात भाजपचा (BJP) मुख्य चेहरा वसुंधराराजे या आहेत. परंतु त्यांचा विधानसभेच्या निवडणूक प्रचार समिती आणि जाहीरनामा समितीमधून पत्ता कट केला आहे. वसुंधरराराजे यांना भाजप का साइडलाइन करत आहे. त्यांच्या व मोदींचा वाद काय आहे ? हे जाणून घेऊया…
एकेकाळचे राजस्थानमधील भाजपचे चेहरे म्हणजे माजी उपराष्ट्रपती भैरोंसिंह शेखावत व माजी संरक्षणमंत्री जसवंत सिंह होय. जसवंत सिंह यांनी वसुंधराराजे यांना राजकारणात आणले. जसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली वसुंधराराजे यांनी राजकीय अस्तित्व निर्माण करत राजस्थानच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. शेखावत हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर वसुंधराराजे राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष होत भाजपच्या मुख्य चेहरा झाल्या. त्या 2003 ते 2008 व 2013 ते 2018 अशा टोन टर्म राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्यात.
आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? सलग दोन ट्विट करत अजितदादांचे शरद पवारांवर थेट वार
दोन टर्म मुख्यमंत्री राहिल्यानंतरही वसुंधराराजे यांना काय साइडलाइन केले जात आहे. त्यासाठी तब्बल वीस वर्ष भूतकाळात जावे लागले. नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या राजकारण उदय झाला होता. ते 2002 गुजरातचे मुख्यमंत्री झाले. राजस्थान व गुजरात हे दोन्ही राज्य शेजारी-शेजारी आहेत. हिंदी बेल्टमधील राज्यात मोदींना आपले महत्त्व वाढवायचे होते. त्यामुळे मोदी हे राजस्थानला जात. परंतु राजघराण्यातून आलेल्या व राजस्थानचे भाजपमध्ये पकड असलेल्या वसुंधराराजे हे मोदींना महत्त्व देत नव्हत्या. त्यामुळे दोघांमध्ये तेव्हापासून राजकीय वितृष्ट आले.
वसुंधरा तेरी खैर नहीं, मोदी तुझसे बैर नहीं घोषणा खरी ठरली
मागील विधानसभा निवडणुकीत मतदार हे वसुंधराराजे यांच्यावर नाराज होते. तर मोदींच्या बाजूने ते होते. त्यासाठी वसुंधरा तेरी खैर नहीं, मोदी तुझसे बैर नहीं अशी घोषणा मतदारांनी दिली होती. वसुंधराराजेंना मतदारांनी झटका दिला होता. तर लोकसभेला ते मोदींच्या बाजूने गेले होते.
वसुंधराराजे यांच्या बाजूने असलेले अनेक नेते हे त्यांच्या विरोधात करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने मते मिळविता येतात. त्यामुळे स्थानिक राजकारणाचे चेहरा नको असतो. हे एक कारणही दिले जात आहे.
भाजपचा सर्व्हेही वसुंधराराजेंच्या विरोधात
राजस्थानमध्ये सलग कोणत्याही पक्षाची सत्ता येत नाही. येथे भाजप व काँग्रेस या पक्षाची आलटून पाटलून सत्ता येते. काँग्रेसला 100-110 जागा मिळतात. परंतु भाजपला जास्त जागा मिळतात. भाजपला 120-150 जागा मिळतात. या आकडेवारीचा सहारा मोदी-शाह घेत आहेत. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार वसुंधराराजे यांना दूर ठेवल्यास काही मतदारसंघात दहा ते पंधरा हजार मतांचा फटका बसू शकते. त्यापेक्षा जास्त फटका बसणार नाही. त्यामुळे भाजपला सत्तेत येण्यास अडचण नाही. त्यामुळे वसुंधराराजे यांना साइडलाइन केल्याचे राजकीय विश्लेषण केले आहे.
Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत आलात; ठाकरेंकडून धारकरांचं स्वागत अन् भाजपला टोला
विशेष म्हणजे प्रचार समिती आणि जाहिरनामा समितीतून दूर केलेल्या वसुंधराराजे नाराज आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. परंतु पंतप्रधानांनी भेट नाकारली असल्याचे वृत्त आहेत. वसुंधराराजे यांचे राजकीय भवितव्य काय आहे हे आता राजस्थानच्या निवडणुकीत समोर येईल.