Rajendra Raut On Rohit Pawar: महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही धार आली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं. त्याला कोणता विषय हाताळायचा याचं ज्ञान नाही,’ अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. ‘अर्धवट माहितीच्या आधारे आणि अर्ध्या हळकुंडात पिवळं झाल्याने जास्त बोलू नये,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
मोठी बातमी ! बनावटगिरी करून तुर्कीचा नागरिक, कुख्यात तस्कर नवप्रीत सिंग भारताच्या ताब्यात
‘रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले’
राजेंद्र राऊत म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र, रोहित पवार दुष्काळाच्या मुद्द्यावर न बोलता इतर विषयांवर भाष्य करत आहेत. ‘रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. आमच्यासारखी माणसं फिल्डवर काम करणारी आहेत,’ असं राऊत म्हणाले.
‘बार्शीच्या योजनेचं श्रेय कोणाचं?’
बार्शीला आज 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, संबंधित योजना 1996 च्या काळातील असल्याचा दावा राऊत यांनी केला. ही योजना 2003 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होतं. ‘तुमच्याच आजोबांच्या काळात ही योजना झाली का पूर्ण? योजना वेळेत पूर्ण झाली असती तर बार्शीला आज हे दिवस आले असते का?’ असा सवाल त्यांनी रोहित पवारांना केला.
चक दे इंडिया ! पुरुष संघाने मलेशियाचा धुव्वा उडवत थेट ऑलिम्पिकचे तिकीट काढले
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. ‘नागरिकांना झुलवत ठेवण्याचं काम पवारांनी केलं,’ असा आरोप त्यांनी केला. मराठवाडा आणि सोलापूरमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्यामागे जबाबदार कोण, याचा विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
रोहित पवार स्टाईल मारत आहेत
‘अर्धवट माहिती घेऊन दिशाभूल करणारे स्फोटक शब्द वापरू नका. आम्ही दुष्काळात फिरत आहोत, तुमचं कोण फिरतंय? रोहित पवार स्टाईल मारत आहेत,’ अशी टीकाही राऊत यांनी केली. ‘या दुष्काळाचं पाप कोणाचं आहे, हे तुम्हीच सांगा. या दुष्काळाला तुम्ही आणि तुमचे पूर्वज जबाबदार आहेत,’ असा थेट आरोप त्यांनी केला. ‘चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत,’ असंही राऊत म्हणाले.
‘वाल्मिक कराड जेलमधून सूत्रे हलवतोय’; बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीडच्या कारागृहाची झडती!
