मोठी बातमी ! बनावटगिरी करून तुर्कीचा नागरिक, कुख्यात तस्कर नवप्रीत सिंग भारताच्या ताब्यात

Navpreet Singh : नवाब वीरक या बनावट ओळखीच्या आधारे त्याने तुर्कीचे नागरिकत्व मिळवले होते

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Navpreet Singh

Navpreet Singh : देशातील अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातायत. त्यात भारताला मोठे यश मिळाले आहे. कुख्यात अंमली पदार्थ तस्कर नवप्रीत सिंगला (Navpreet Singh) तुर्कीने भारताच्या ताब्यात दिले आहे. मोदी सरकारसाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवरूनही ही माहिती दिलीय.

नवप्रीत सिंग हा कुख्यात अंमली पदार्थ तस्कर आहे. नवाब वीरक या बनावट ओळखीच्या आधारे त्याने तुर्कीचे नागरिकत्व मिळवले होते. त्यानंतरही अफगाणिस्तानातून भारतात हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइनची तस्करी सुरूच ठेवली होती. भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा माग काढत अनेक स्तरांवरील तपास करून त्याची खरी ओळख उघडकीस आणली. त्याला भारतात प्रत्यार्पित करून आणण्यात यश मिळवले आहे. आज त्याला भारतात आणण्यात आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या यशाबद्दल सर्व तपास आणि सुरक्षा यंत्रणांचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अभिनंदन केले आहे.

भारतामध्ये आणल्यानंतर नवप्रीत सिंगला अमली पदार्थांची तस्करी आणि इतर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या कारवाईसाठी त्यांनी संबंधित सर्व तपास आणि सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन केले. डिसेंबर 2029 पर्यंत देशातील प्रत्येक नार्को-कार्टेलचा नायनाट करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, असेही अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us