Download App

ठाकरेंची वाघीण देणार पिता-पुत्रांना मोठा धक्का; ‘राजकीय घटस्फोट’ घेत करणार दादांच्या पक्षात प्रवेश?

Priyanka Chaturvedi May Join Ajit Pawar’s NCP : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) अजितदादांच्या (Ajit Pawar) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय घटस्फोट देण्यास सज्ज असल्याची माहिती मिळतेय.

हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 अब्ज डॉलर्सचे अनुदान थांबवले, धक्कादायक कारण…

प्रियंका चतुर्वेदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्यास सज्ज आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांनी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. पक्षात सामील होण्याची उत्सुकता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पुढील 11 महिन्यांत संपत आहे. मागील आठवड्यातच प्रियंका यांनी एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी हे सर्व नियोजित प्रयत्न होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रियंका चतुर्वेदी पक्ष बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार म्हणून राहतील, या अटीवर त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रियंका चतुर्वेदी अजित पवारांसोबत गेल्यास हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जाईल.

मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी…राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (यूबीटी) या दोन्ही पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या नेत्यांची राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 चा आकडाही गाठता आला नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेनेच्या (उत्तर प्रदेश) प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे आता पुन्हा राज्यसभेत जाऊ शकणार नाहीत. शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांची 3 एप्रिल 2020 रोजी सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली होती. तर राऊत यांची निवड जुलै 2022 मध्ये झाली होती. पवार आणि चतुर्वेदी दोघांचाही कार्यकाळ 3 एप्रिल 2026 रोजी संपत आहे, तर राऊत यांचा कार्यकाळ 22 जुलै 2028 रोजी संपणार आहे.

त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेची दारं होत असल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी अजित पवार गटाची वाट धरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

या सर्व घडामोडींवर प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक तृतीय श्रेणीचा पत्रकार कॉर्पोरेट क्लायंटसाठी अजेंडा वापरतोय. तो माझ्याबद्दल खोटे पसरवू लागला आहे. या दयनीय व्यक्तीने आधीही प्रयत्न केले होते, आता त्याने पुन्हा त्याच्या इशाऱ्यावर काम सुरू केले आहे. तो क्लायंट त्याच्यावर काही तुकडे फेकेल जसे तुम्ही जेलबर्डसारखे ट्रोलवर फेकले असतील. औकात ही वही है, बिकाऊ… असं म्हणत त्यांनी या अफवांवर उत्तर दिलंय.

 

follow us