Download App

Markadwadi : आधी जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार; राम सातपुतेंचं आव्हान

जानकरांनी आधी राजीनामा द्यावा, रणजितसिंह मोहिते पाटलांनीही लाज वाटत असेल तर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. मी कशावरही निवडणूक लढवण्यास तयार

  • Written By: Last Updated:

Ram Satpute : मारकडवाड (Markadwadi) गाव सध्या विरोधी पक्षांच्या ईव्हीएमविरोधी (EVM) लढाचं केंद्रस्थान बनत चाललंय. या गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत गावात पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने अशा प्रकारच्या मतदानाला बेकायदेशीर ठरवून विरोध केला. त्यानंतर शरद पवार गटाचे विजयी आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी घोषणा केली. त्यावर आता भापज उमदेवार राम सातपुतेंनी (Ram Satpute) जानकरांना आव्हानं दिलं.

Farmers at Punjab Haryana Border : MSP चा मुद्दा तापला! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; पोलिसांनी सीमेवरच रोखलं… 

उत्तमराव जानकर यांनी आधी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, असं आव्हान राम सातपुते यांनी दिलं.

राम सातपुतेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे खोटा नॅरेटिव्ह तयार करत आहेत. शरद पवार गटाचे 10 आमदारन निवडणूक येणं हे लाजीवरवाणी बाब आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचे इतकी कमी आमदार निवडून आल्यानं त्यांची आता अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. मुळात मारकडावी गाव कायम विकासबरोबर राहिले. या गावाला मी 21 कोटींचा निधा दिला. इथले ग्रामस्थ आणि मतदार मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असून त्यांच्याकडून या गावाला फुटकी कवडी मिळाली नाही. मोहित पाटलांनी गावकऱ्यांचा त्यांचा ऊस तोडला नाही, दूध घेतलं नाही. त्यांनी या गावात कोणतीही विकासकामे केली नाहीत, असं म्हणत उत्तम जानकर यांच्या विरोधात मला मिळालेली मते ही माझी विकासकामे आणि मोहिते पाटील यांच्या विरोधामुळे मिळाल्याचं सातपुते म्हणाले.

‘मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल…’; २०१४ पासूनची आकडेवारी दाखवत बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल 

ते म्हणाले, याआधी उत्तमराव जानकरांना जी काही मते पडली, ती मोहित पाटलांच्या विरोधात पडली होती. गेल्या निवडणुकीला मी मोहिते पाटलांसोबत होतो, त्यामुळं मतदारांनी जानकरांना मते दिली. आता मोहित पाटील आमच्यासोबत नाहीत. ते जानकरांसोबत आहेत. त्यामुळं मतदारांनी मोहित पाटलांना विरोध म्हणून मला मते दिली, असंही सातपुते म्हणाले.

उत्तमराव जानकर यांनी मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवायला तयार असल्याचं म्हटलं. याविषयी सातपुतेंनी विचारलं असता ते म्हणाले की, उत्तम जानकर यांनी आधी राजीनामा द्यावा, रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही मनाची लाज वाटत असेल तर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. मी कशावरही निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे आव्हान राम सातपुते यांनी दिले आहे.

नेमकं जानकर काय म्हणाले होते?
येत्या १५ दिवसांत बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले, ते बाजूला करावे, असा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत. त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे. ईव्हीएमच्या विरोधात कोणीतरी बलिदान दिले पाहिजे. यासाठी मी तयार आहे, असं जानकर म्हणाले.
पुढं ते म्हणाले, जे ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेत आलेत, त्यांना केवळ 25.1 टक्के मते मिळाली. उर्वरित मते ज्यांना मिळाली त्यांचा पराभव झाला. यशोमती ठाकूर, बच्चू कडू हे सभागृहाच्या बाहेर कसे राहू शकतात? असा सवाल करत माझ्या आपल्या मतदारसंघात सुमारे एक लाख मते वळवल्याचा आरोपही उत्तमराव जानकर यांनी केला.

follow us