Download App

चौंडीचं ‘राजकारण’ करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागले; राम शिंदेंनी रोहीत पवारांना सुनावलं

Ram Shinde on Rohit Pawar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सपत्नीक चौंडीतील महादेव मंदिरामध्ये अभिषेक केला.

Kapil Sharma: कपिल शर्माने थेट आमिर खानचे पाय धरले, आमिरने व्यक्त केली ‘ही’ नाराजी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची पहाटेपासूनच लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत हा शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे.

Aai Kuthe Kay Karte मधील अनिरुद्धला ओळखणं ही जातय कठीण, 90 च्या दशकात या मालिकेत केलं होतं काम

यावेळी चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. त्यामध्ये एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. त्यावर भूषण सिंह राजे होळकर यांनी चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळावर होणाऱ्या पुण्यतिथी निमित्त होत असलेल्या कार्यक्रमात होत असलेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलतांनी भाजपचे राम शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालं’; विखे पाटलांची शिंदे-फडणवीसांसमोर टोलेबाजी

राम शिंदे म्हणाले, ‘राजे यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय योग्य असून आम्ही चौंडीमध्ये कधीही राजकारण केलेले नाही ज्या लोकांनी राजकारण केला आहे त्यांना त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. ज्या-ज्या वेळेस ज्या ज्यांची सत्ता असते ते सर्वच या कार्यक्रमाला ते येत असतात त्यामुळे मी कधीही या ठिकाणी राजकारण केले नाही असेही राम शिंदे म्हणाले.’

शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….

यावेळी चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. त्यामध्ये एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. त्यावर राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“PM मोदी देवालाही शिकवतील की…”; अमेरिकेतून राहुल गांधींनी डागली तोफ

राम शिंदे म्हणाले की, शासकीय जयंती सोहळ्याच्या पत्रिकेवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यासमोर नतमस्तक होणं यात गैर नाही पण प्रथा, परंपरा मोडणं वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं यावर विचार विनिमय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.

Tags

follow us