Aai Kuthe Kay Karte मधील अनिरुद्धला ओळखणं ही जातय कठीण, 90 च्या दशकात या मालिकेत केलं होतं काम

Aai Kuthe Kay Karte मधील अनिरुद्धला ओळखणं ही जातय कठीण, 90 च्या दशकात या मालिकेत केलं होतं काम

Aai Kuthe Kay Karte: 90 च्या दशकातील मालिका आजही लक्षात राहणाऱ्या आहेत. त्या काळच्या मालिका, भूमिका या सगळ्याच गोष्टी जणू आठवणींचा साठा आहे. अशीच एक मालिका म्हणजे कॅम्पस. (Aai Kuthe Kay Karte) कॅम्पस या मालिकेने तरुणाईला आकर्षित केलं होतं. कॉलेज जीवनावर आधारित या मालिकेत अनेक कलाकार होते. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध (Anirudh) म्हणून प्रसिद्ध असलेले मिलिंद (Milind) देखील कॅम्पस या मालिकेचा महत्त्वाचा भाग होते. याच मालिकेची आठवण त्यांनी नुकतीच सोशल मिडीयावर (Social media) शेयर केली आहे.

या मालिकेचे कॅमेरामन भरत नेरकर यांच्याविषयी लिहीताना त्यांनी खास आठवणी शेयर केल्या आहेत. सोबत फोटो आणि व्हिडीओही त्यांनी जोडलेत. मिलिंद गवळी लिहीतात की, “कैंपस नावाची खूप पॉप्युलर सीरियल झी टीव्हीवर १९९१-९२ साली दर सोमवारी ९.०० वाजता यायची , त्या सीरियल चे दिग्दर्शक होते स्वर्गीय संजीव भट्टाचार्य, संजीव जी ने “चुनौती”नावाची एक पॉप्युलर सीरियल दूरदर्शन साठी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by आई कुठे काय करते (@aai_kuthe_kay_karte_official)


तसेच ती खूप मोठ्या प्रमाणात गाजली होती ती, मग झी टीव्हीने त्यांना ” कैंपस ” नावाची सिरियल करायला सांगीतली, कॉलेज जीवनावर आधारित सीरियल होती ती , या सिरीयल साठी संजीव जीना हवे होते कैमरामैन श्री भरत नेरकर, पण भरतजी पुण्याच्या फिल्म इंस्टीट्यूट मध्ये कॅमेरा डिपार्टमेंय चे प्रोफ़ेसर होते, संजीव जी ने आग्रह धरला की त्यांनी मुंबईला येउन ही सीरियल शूट करावी, ते पुणे सोडून मुंबई ला आले आणि ही सीरियल सूट करायला लागले, ही सीरियल लोकप्रिय झाली, लोकप्रिय होण्याचे अनेक कारणं होती पण एक महत्वाचं कारण म्हणजे भरत नेरकरांचं कैमरा वर्क.

वन शॉट वन सीनचे ते मास्टर होते. इंडस्ट्री मधील लोकं त्याचं कैमरा वर्क बघायला ही सिरियल बघायचे, अभ्यास म्हणून, प्रत्येक सिनची त्यांची खूप सुंदर कोरियोग्राफी असायची. काल कैंपस मधला पापिया सेनगुप्ता बरबरा चा एक सीन मी पाहिला आणि आणि कॅमेरा मागचे भरत नेरकर चटकन आठवले, मी हा सीन बघितला की तुमच्या लक्षात येईल, कॉर्डलेस माईक्स नव्हते. त्यावेळेला बूममॅन असायचा माईक धरून, कधी कधी फ्रेम मध्येच घुसायचा तसाच आता चा “आई कुठे काय करते” या सीरियल मधला कॅमेरामॅन राजू देसाई, अतिशय सुंदर शॉट्स आणि सुंदर कोरियोग्राफी करतो.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

हे सगळे पडद्यामागचे हिरो आहेत. कॅमेरामॅन समीर अठल्ले , संजय मेमाणे, प्रसाद भिंडे हे सगळे उत्कृष्ट कॅमेरामॅन आणि मी भाग्यवान आहे. मला या लोकांबरोबर काम करायला मिळालं. प्रेक्षक ज्यावेळेला आमचा एखादा चित्रपट किंवा सिरीयल बघतात, आमचे त्यातले सीन बघतात, त्यावेळेला त्यांना आम्ही दिसत असतो, पण ज्यावेळेला मी तोच सीन बघतो, त्यावेळेला मला त्या सीनच्या मागचे, हे कॅमेरामॅन त्यामागे बसलेले हिरो दिसतात, मला हे सगळे अतिशय हुशार ब्रिलियंट कॅमेरामन दिसत असतात, जे प्रेक्षकां समोर कधी येतच नाहीत.”

या पोस्टमधून मिंलिंद गवळी यांनी पडद्यामागील हिरो कॅमेरामॅन्सच्या कामाचं कौतुक केलय. कलाकारांना पडद्यावर आणि टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी उत्तम टिपण्याचं काम हे कॅमेरामॅन करतात. त्यांचं काम हे खरच जबाबदारीचं आणि उल्लेखनीय आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube