Download App

Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; राम शिंदे म्हणाले, प्रथा, परंपरा…

Ram Shinde on Rohit Pawar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सपत्नीक चौंडीतील महादेव मंदिरामध्ये अभिषेक केला.

कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला दिला बरखास्तीचा इशारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची पहाटेपासूनच लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत हा शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे.

चाकरमान्यांना गुड न्यूज! गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम पूर्ण होणार; मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

यावेळी चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. त्यामध्ये एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. त्यावर राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Manipur violence: ‘प्रादेशिक अखंडतेशी छेडछाड केल्यास भारताचे प्रतिनिधित्व करणार नाहीत’

राम शिंदे म्हणाले की, शासकीय जयंती सोहळ्याच्या पत्रिकेवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यासमोर नतमस्तक होणं यात गैर नाही पण प्रथा, परंपरा मोडणं वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं यावर विचार विनिमय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.

Delhi Murder Case : “बदमाश, कहाँ चली गई थी तेरी बदमाशगिरी…” साक्षीचे हेच शब्द साहिलला टोचले…

पुढे ते असं देखील म्हणाले की, शासकीय जयंतीचे दोन कार्यक्रम साजरे केले जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. त्यामुळे या सोहळ्याला गेल्या वर्षीप्रमाणे राजकीय वळण मिळालं आहे.

Tags

follow us