Ram Shinde on Rohit Pawar Police station Arrogance during Jitendra Awhad movement : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde ) यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या सदरामध्ये मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. त्यामध्ये त्यांना आव्हाडांच्या पोलिस स्टेशन समोरील आंदोलनावेळी रोहित पवारांनी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवर चढवलेल्या आवाजाच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवारांना सुनावल्याचं पाहायलं मिळालं.
मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ‘सॅन होजे’मध्ये नाफा चित्रपट महोत्सव; विविध कार्यक्रमांची मेजवानी
यावेळी बोलताना राम शिंदे (Ram Shinde ) म्हणाले की, तिथे काय प्रसंग होता हे मला माहिती नाही. पण पोलिसांसोबत अधिकाऱ्यांशी बोलताना आपण ज्या प्रमाणे इतरांना नियम शिकवतो, गप्पा मारतो त्याच प्रमाणे वागावं. नाही तर इतरांना ब्रम्हज्ञान शिकवायचं आणि आपण मात्र काळा पाषाण असं होतं. म्हणजे आपण नियमांचं उल्लंघन करायचं. असं कुणीही करू नये. असं म्हणत राम शिंदे यांनी यावेळी रोहित पवारांना टोला लगावला आहे.
दावा भाजपाचा पण, शिंदेंच्या शिलेदाराची फिल्डिंग; पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे फायनल?
तसेच पुढे शिंदे (Ram Shinde ) म्हणाले की, ज्याप्रमाणे रोहित पवार हे सत्तेत होते तेव्हा पोलिस कसे चांगले आहेत? त्यांनी काय करायला हवं? हे सांगत होते. मग आता त्यांनी पोलिसांच्या विरोधात बोललं नाही पाहिजे. तसेच तेथे पोलिसांना आणखी वेगळ्या भाषेमध्ये सांगता आलं असतं. तुम्ही आमदार आहात हे काही तुमच्या कपाळावर लिहिलेलं नाही ना. ते तुमचा ऑरा, डेकोरम आणि बोलण्याची पद्धत यावरून तुम्ही कोण आहात हे कळालं पाहिजे. जर तुम्ही पोलिसांना आमदार वाटलेच नसाल मग पोलिस बोलले. पण जेव्हा त्यांना काळालं की, रोहित पवार आमदार आहेत. तेव्हा पोलिस काहीही बोलले नाही. असं म्हणत यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवारांनी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवर भडकल्याच्या प्रकरणावरून टोला लगावला आहे.
मोठी बातमी! अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनला लागली आग
नेमके प्रकरण काय?
विधान मंडळातील गोंधळानंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलीस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली होती.
Ram Shinde Exclusive : रोहित पवार पोलिसांनाही आमदार वाटले नाहीत म्हणून…; शिंदेंनी काढला चिमटा
शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. आवाज खाली, हातवारे करून आमदारासोबत बोलायचं नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता. आमदार पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबरोबरत त्यांचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.