मोठी बातमी! अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनला लागली आग

मोठी बातमी! अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनला लागली आग

Ahmedabad to Diu Indigo Plane Catches Fire : अहमदाबाद विमान अपघाताची (plane) धग कायम असतानाच आता अहमदाबादहूनच मोठा बातमी समोर आली आहे. गुजरातमधील दीवला जाणारे इंडिगोचे विमान इंजिनला आग लागल्याने रद्द करण्यात आलं. घटनेच्या वेळी विमानात ६० प्रवासी होते.

सकाळी ११ वाजता विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रणाला “मेडे” कॉल पाठवला. त्यानंतर उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आलं आणि प्रवाशांना सुरक्षितपणं खाली उतरवण्यात आल.

अहमदाबाद विमान अपघात;एएआयबीच्या अहवालात काय?, DGCAने घेतला  हा; मोठा निर्णय

इंडिगोचं निवेदन

२३ जुलै रोजी अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई ७९६६ मध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड दिसून आला. मानक कार्यप्रणालीनुसार, वैमानिकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि विमान परत खाडीत परत आणले. विमान पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या घटनेची चौकशी सुरू आहे असं आपल्या निवेदनात इंडिगोने म्हटलं आहे.

कालही घडली होती घटना

दिल्ली विमानतळावर एक घटना घडली ज्यामध्ये एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. हाँगकाँगहून एअर इंडियाचे AI-315 विमान विमानतळावर उतरताच, ते गेटवर पार्क करण्यात आलं. काही वेळाने, त्याच्या सहाय्यक पॉवर युनिटला (APU) आग लागली. इंजिन बंद असल्याने फारसे नुकसान झालं नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या