Download App

रिपाइंला लोकसभेची एकही जागा न मिळाल्यास एनडीएची साथ लगेच…; आठवलेंचं मोठं वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीच (Lok Sabha elections) बिगुल वाजला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी कोणता पक्ष किती जागांवर लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) (आठवले गट) उडी घेतली आहे. महायुतीने (Mahayuti) राज्यात आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

Electoral Bonds : 21 मार्चपर्यंत पूर्ण माहिती द्या; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI फटकारले 

आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, रिपब्लिकन एनडीएमध्ये असल्याने आम्ही सोलापूर आणि शिर्डीच्या जागांची मागणी करत आहोत. रिपब्लिकन पक्ष छोटा असला तरी भाजप नेत्यांना भेटलो आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा त्यांच्यासोबत आहे. शिंदे गटाचे तिथे खासदार आहेत, मला संधी दिली तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये फायदा होईल, असं आठवले म्हणाले.

Elvish Yadav: एल्विशवर नोएडा पोलिसांची मोठी कारवाई, ‘त्या’ प्रकरणात केली अटक 

ते म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. आता महाराष्ट्रात सोलापूर आणि शिर्डी या मतदारसंोघाची अपेक्षा आहे. मात्र, एकही जागा नाही मिळाली तरी एनडीएची साथ लगेच सोडण्याचा विचार करणार नाही, असंही आठवले म्हणाले.

राज्यात अजितदादा गटाचा विस्तार झाला. मात्र, आमचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळं या निवडणुकानंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद द्यावे, अशी मागणी आठवलेंनी केलीय

महाविकास आघाडीकडून वंचितचा अपमान

तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. महाविकास आघाडीकडून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा सल्लाही त्यांनी वंचितला दिला. आठवले म्हणाले, महाविकास आघाडीकडून वंचितला डावलण्याचा, वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वंचित महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असतानाही त्यांना सोबत घेण्यासाठी चालढकल केली जात आहे. महाविकास आघाडीत जर त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, असं आठवले म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. चैत्यभूमीवर आल्याबद्दल राहुल गांधींचे आभार. पण त्याकाळात बाळासाहेब ठाकरेही मोठमोठ्या सभा घ्यायचे, पण त्या सभाचं मतांमध्ये रुपांतर होत नव्हतं. इंडिया आघाडीची सभआ मोठी असली तरी त्यांना फार यश मिळेल, असं वाटत नाही.

follow us

वेब स्टोरीज