Electoral Bonds : 21 मार्चपर्यंत पूर्ण माहिती द्या; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI फटकारले

  • Written By: Published:
Electoral Bonds : 21 मार्चपर्यंत पूर्ण माहिती द्या; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI फटकारले

Supream Court On Electoral Bonds Data :  इलेक्टोरल बाँड्सच्या माहितीवरून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने SBI ला झाप झाप झापले असून, माहिती देताना निवडक देण्याऐवजी संपूर्ण आणि अचूक देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच SBI ने इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित संपूर्ण माहिती 21 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी अशी टाईमलाईनही SBI ला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात आपली बदनामी होत असल्याचे मत एसबीआयतर्फे न्यायालयात मांडण्यात आले आहे.

2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 हप्त्यांमध्ये 16,518 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले आहेत. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने SBI ला 12 एप्रिल 2019 पासून खरेदी केलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते.

भाजपाला छप्परफाड देणगी

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांविषयीची (Electoral Bond Data) माहिती देण्याचे आदेश दिल्यानंतर भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाकडे माहिती देण्यात आली होती. या माहितीनूसार भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सर्वाधिक देणग्या घेणारा पक्ष असल्याचे समोर आले आहे. ज्यात 12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पक्षाला सर्वाधिक 6,060 कोटी रुपये मिळाले आहेत.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यावधी मिळाले असल्याचंही समोर आलं आहे. निवडणूक रोख्यांमध्ये देशात भाजपच पहिल्या नंबरवर असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसच्या (Congress) नावावर 1 हजार 609 नोंदी असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देशातील अनेक पक्षांच्या नोंदी आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या नावानेही नोंदी आढळून आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआयकडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत या पाच वर्षांच्या काळात 18,871 निवडणूक रोखे खरेदी केले गेले. तर याच काळात 20,421 रोखे वटवले गेले. भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आणि त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले आहेत.

SBI ने प्रतिज्ञापत्रात काय म्हटले?

तत्पूर्वी, SBI ने बुधवारी सुप्रीम कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, त्यात सांगितले होते की 1 एप्रिल 2019 ते या वर्षी 15 फेब्रुवारी दरम्यान देणगीदारांनी एकूण 22,217 निवडणूक रोखे खरेदी केले होते, त्यापैकी 22,030 राजकीय पक्षांनी रोखून धरले होते. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की प्रत्येक निवडणूक रोखे खरेदीची तारीख, खरेदीदाराचे नाव आणि खरेदी केलेल्या बाँडचे मूल्य यासह तपशील सादर केला आहे.

 

बातमी अपडेट होत आहे…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube