Ramdas Kadam claim Devendra Fadanvis promise about Vidhansabha Seat : शिवसेनेचे नेते रामदास कदम ( Ramdas Kadam) यांनी रत्नागिरी लोकसभेची जागा भाजपच्या नारायण राणेंना (Narayan Rane ) दिल्याबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही ही उणीव विधानसभेला भरून काढणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) तसा शब्द दिल्याचं देखील कदम म्हणाले.
‘निवडून आले चार अन् पक्ष उरला पाव’ फडणवीसांनी उडवली पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली
यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, रायगडमधील परिस्थिती माहिती आहे. तेथे 2019 ला शिवसेनेच्या चिन्हावर लढणारे अनंत गीतेंचा पराभव झाला होता. त्यामुळे महायुतीमध्ये विद्यमान खासदार असणाऱ्या तटकरे यांना संधी दिली. ते आम्हाला मान्य आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेला जागा मिळेल असा मला वाटलं होतं.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती.
‘बारामतीत इन कॅमेरा मतदान घ्या’; सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
पण शेवटच्या क्षणी नारायण राणे यांचा पारडं जड झालं आणि त्यांना उमेदवारी मिळाली. तसेच ते देखील मुळचे शिवसैनिक आहे. तसेच राजकारणात कोणीच कुणाचा कायमचां शत्रू नसतो तसेच मित्रही नसतो. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असावा. ही उणीव आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरून काढणार आहोत. याबद्दल माझं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्याशी चर्चेनंतर माझं समाधान देखील झालं आहे.
दरम्यान महायुतीच्या जागावाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली होती. या मतदारसंघातील नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे तिढा निर्माण झाला होता. अखेर या तिढ्यावर मात करत भाजपने हा मतदारसंघ खेचून घेतला. किरण सामंतांना माघार घ्यायला लावली आणि नारायण राणेंचं तिकीट पक्कं केलं. नारायण राणेंनी प्रचार सुरू केला. पहिल्याच दमात अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होऊ असा हुंकार त्यांनी भरला आहे.