‘निवडून आले चार अन् पक्ष उरला पाव’ फडणवीसांनी उडवली पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली

‘निवडून आले चार अन् पक्ष उरला पाव’ फडणवीसांनी उडवली पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली

Devendra Fadnavis on Sharad Pawar NCP Manifesto : मला आश्चर्य वाटतं. आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला. अरे, 542 लोकांमध्ये तुम्ही लढवता दहा खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगणार? गेल्या निवडणुकीत तुमचे निवडून आले चार. आता पक्ष उरला पाव. तरीदेखील तुम्ही जाहीरनामा सांगणार? अशा शब्दांत खिल्ली उडवत लक्षात ठेवा यांचा जाहीरनामा नाही एकच जाहीरनामा चालणार तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा. तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील याच्या प्रचारार्थ शिरुर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. तसेच राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. आगामी निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीरनामाच चालणार असेही त्यांनी सांगितले.

‘शिरुरची लोकं हुशार, एकदाच तिकीट घेतात नाटक फ्लॉप निघालं तर..’ फडणवीसांचे कोल्हेंना खोचक टोले

फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक नेहमीची नाही. कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. दहा वर्षांत मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. त्याची आज जगभरात चर्चा होत आहे. वीस कोटी लोकांना पक्की घरे दिली. 50 कोटी लोकांच्या घरी गॅस पोहोचवला. साठ कोटी लोकांच्या घरात नळानं पाणी दिलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. त्यातील सात कोटी महाराष्ट्रातील आहेत. 61 कोटी युवकांना मुद्रा लोन दिलं. यातील 31 कोटी महिला आहेत. देशात 80 लाख बचतगट तयार केले. त्यांना आठ लाख कोटींचे कर्जवाटप करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मोदींनी ऊस साखर कारखानदारीतलं काय कळतं अशी टीका विरोधकांकडून होते. पण यासाठी मोदींनी जे निर्णय घेतले ते पन्नास वर्षात कधीच घेतलं गेले नाहीत. इथेनॉलच्या माध्यमातून जोडधंदा उपलब्ध करून दिला. काँग्रेसच्या काळातील शेतकऱ्यांवरचा दहा हजार कोटींचा इनकम टॅक्स रद्द केला. विरोधकांना हे काम जमलं नाही.

कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट

फडणवीसांनी केलं आढळरावांचं कौतुक

बोलबच्चन देणारे अनेक नेते पाहिले असतील पण मोदी काम करणारे आहेत. आढळराव पाटलांचं कामही उत्तम आहे. यादी पहा त्यांनी संसदेत किती प्रश्न विचारले. बैलगाडा शर्यत बंद झाली होती त्यासाठी संघर्ष केला. आमचं सरकार आल्यानंतर शर्यत पुन्हा सुरू करून दाखवली,असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube