Download App

रणबीर ‘अॅनिमल’चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगासोबत चर्चेत मग्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

  • Written By: Last Updated:

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या (Animal movies) टीझरमध्ये रुद्र अवतार धारण करून सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना  आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Maratha Reservation : आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत 

सिनेरसिक आणि रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, संदीप रेड्डी वंगा यांनी रणबीर सोबतचा आपला आपला फोटो शेअर केला.

संदीप रेड्डी वंगा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत रणबीर आणि संदीप हे दोघही खुर्च्यांवर बसून गहन चर्चा करतांना दिसतात. चर्चेत मग्न असलेल्या रणबीरने फोटोत काळा जॅकेट घातला आहे. त्याचा लांब केसांचा लूक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. हा रणबीरचा अॅनिमल चित्रपटातील लूक आहे.

Maratha Reservation: भुजबळांनी सरकारविरोधी भूमिका का घेतली? कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री, मंत्र्यांचे खलबते ! 

अनिल कपूरनेही एनिमलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानीचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे.

अॅनिमल हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अ‍ॅनिमल हा ‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा चित्रपट आहे. त्यामुळं या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट हिंदी सोबतच तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या लोकप्रिय चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us