Rashtriya Maratha Party Support to Sambhajirao Patil Nilangekar : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. आज सायंकाळी सहा वाजता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान निलंगा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रीय मराठा पार्टीने (Rashtriya Maratha Party) निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे निलंग्यातील उमेदवार आकाश प्रकाश पाटील यांनी तश आशयाचं पत्रही आमदार निलंगेकर यांना प्रदान केलंय.
आकाश प्रकाश पाटील यांनी राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने निलंगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक प्रक्रियेत ते सहभागी झाले होते. परंतु आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी (Assembly Election 2024) केलेले कार्य पाहून त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. निलंगेकर यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चातील सहभाग आणि आरक्षणासाठी त्यांनी केलेली मदत लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील यांच्या लेटरहेडवर उमेदवार आकाश पाटील यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सुपूर्द केले आहे.
मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीने मतदान करा, संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन
या पत्रात लिहिलंय की, निलंगा विधानसभा मतदार संघाचा झालेला विकास आणि मराठाक्रांती ठोक मोर्चात त्यांचा असलेला सहभाग, आरक्षणातील मदत या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन राष्ट्रीय मराठा पार्टी आपल्या सोबत आहे. या ठिकाणी निलंगा मतदार संघ 238 निवडणुक 2024 विधानसभा मतदार संघातुन पक्षाचे उमेदवार आकाश प्रकाश पाटील यांचा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील यांना जाहिर पाठींबा देत आहे.
निलंगा येथे उद्या महायुतीची आशीर्वाद सभा; हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज
आता निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संभाजीराजे निलंगेकर यांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा पाठिंबा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे हात मजबूत करण्यासाठी व विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी साकोळ येथील शेकडो तरुण तडफदार युवकांनी निलंगा येथील निवासस्थानी भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रसंगी संभाजी पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं.