Raj Thackeray On Politics : राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार(Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये(NCP) बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारला(Shinde-Fadnavis government) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा (Politics)नवा अध्याय सुरु झाला आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, राज्यामध्ये जो व्याभिचार सुरु आहे, तो मी करणार नाही. मला जर तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले आहे. ते रत्नागिरीतील(Ratnagiri) चिपळूणमध्ये(Chiplun) महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.(ratnagiri raj Thackeray criticise on current politics mns workers meeting)
भाजपकडून अजितदादांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न; शरद पवार गटाचा आरोप
राज ठाकरे यांनी मनसे पक्षबांधणीसाठी कोकण दौरा सुरु केला आहे. चिपळूननंतर राज ठाकरे खेड आणि दापोलीमध्येही जाणार आहेत. चिपळूनमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरू, महिन्याला 2,80,000 पगार, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज
राज ठाकरे म्हणाले की, आपण आपला विचार लोकांपर्यंत का पोहोचवायचा असं म्हणत आहोत? पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदानुसार कार्यकर्त्यांशी न बोलता मनाने एकमेकांशी बोलत राहावे असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी चिपळूनमध्ये मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
"राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही." – सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे (रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात) #कोकण_दौरा #मनसेचंकोकण pic.twitter.com/DDxqJ6JnYb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 13, 2023
ठाकरे म्हणाले की, एखाद्या पदावर बसल्यानंतर काम करावं लागेल, अन्यथा त्या पदावर राहता येणार नाही, असा सज्जड दम देखील यावेळी दिला. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या 15 दिवसात मी विविध ठिकाणी मेळावे घेणार आहे. त्यामध्ये आपली भूमिका घेणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
त्याचवेळी लोकसभेची निवडणूक लढवायची? दारु, मटण, पार्ट्या यासाठी निवडणुका लढवायच्या का? अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फटकारले. त्याचबरोबर शाखा नव्हे तर नाका उभा करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा असं आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.